Congress agitation at Udgir | उदगीर येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन

उदगीर येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन

उदगीर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी मंजूर करुन घेतलेले कायदे रद्द करावेत तसेच काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या  धक्काबुक्कीचा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला़.

केंद्र सरकारने मंजूर करुन घेतलेले शेतकरी विरोधी कायदे त्वरित रद्द करावेत़, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची सक्ती करावी़, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कायदेशीर संरक्षण देवून त्या अस्तित्वात राहण्याची हमी द्यावी, अशा विविध मागण्या यादरम्यान करण्यात आल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, रामकिशन सोनकांबळे, शिलताई पाटील, शहराध्यक्ष मंजूरखाँ पठाण, उषाताई कांबळे, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, नगरसेवक महेबुब शेख, अनिल मुदाळे, अहमद सरवर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Congress agitation at Udgir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.