इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:01 IST2026-05-06T12:00:21+5:302026-05-06T12:01:51+5:30

Iraq Oil Offer : इराकने जागतिक बाजारपेठेपेक्षा ७०% स्वस्त कच्चे तेल विकण्याची ऑफर दिली आहे. बसरा ग्रेड क्रूडसाठी ३१०० रुपये किंमत निश्चित.

Iraq's big 'offer' to the world! A barrel of crude oil worth Rs 11,000 will be sold for Rs 3,100; There is only one condition... | इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...

इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...

बगदाद: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना इराकने जगाला थक्क करणारी ऑफर दिली आहे. अमेरिकन नाकाबंदी आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराकने प्रति बॅरल ३,१०० रुपये दराने कच्चे तेल विकण्याची घोषणा केली आहे. सध्या जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा दर सुमारे ११,००० रुपये असताना इराकने दिलेली ही सवलत ७० टक्क्यांहून अधिक आहे.

बसरा ग्रेड ऑईलसाठी अट काय?
इराकच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी खरेदीदारांना 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मध्ये यावे लागेल. इराकचे 'बसरा ग्रेड' तेल, जे अत्यंत उच्च दर्जाचे मानले जाते, ते इराकच्या स्वतःच्या टँकर्समधून पुरवले जाईल. एका बॅरलमध्ये १५९ लिटर तेल असते, या हिशोबाने इराकची ही किंमत जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडवून देणारी ठरू शकते.

इराकची चिंता आणि अमेरिकेची भूमिका
संयुक्त अरब अमिरातीने 'ओपेक' मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने इराकच्या तेल निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराकची ९० टक्के अर्थव्यवस्था ही खनिज तेलावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, इराकच्या तेल क्षेत्रात हॅलिबर्टन आणि एसएलबी यांसारख्या मोठ्या अमेरिकन कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे इराकचा असा विश्वास आहे की, अमेरिका या तेल टँकर्सना सागरी सुरक्षा पुरवेल, ज्यामुळे खरेदीदारांचा धोका कमी होईल.

जागतिक परिणाम
जर इराकचा हा प्रयत्न यशस्वी झाला, तर जागतिक स्तरावर इंधनाचे दर कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, होर्मुज सामुद्रधुनीतील वाढता लष्करी तणाव आणि अमेरिकेची यावरील अधिकृत प्रतिक्रिया यावर बरेच काही अवलंबून असेल.

Web Title : इराक का बड़ा ऑफर: 3100 रुपये प्रति बैरल कच्चा तेल, एक शर्त!

Web Summary : इराक होर्मुज जलडमरूमध्य पर खरीदारों के आने पर 3100 रुपये प्रति बैरल पर कच्चा तेल दे रहा है, जो 70% की छूट है। वैश्विक तनाव और उच्च तेल की कीमतों के बीच, यह कदम होर्मुज सुरक्षा और अमेरिकी प्रतिक्रिया पर निर्भर, वैश्विक ईंधन लागत को महत्वपूर्ण रूप से प्रभावित कर सकता है।

Web Title : Iraq Offers Cheap Oil: $3100 Per Barrel, One Condition!

Web Summary : Iraq offers crude oil at $3100 per barrel, a 70% discount, if buyers come to the Strait of Hormuz. This move, amidst global tensions and high oil prices, could significantly impact global fuel costs, dependent on Hormuz security and US response.