Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात

Most Sixes in IPL: चेन्नईचा सुपरकिंग्जचा फलंदाज संजू सॅमसनने डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला असून आता त्याची नजर एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:07 IST2026-05-06T12:05:32+5:302026-05-06T12:07:34+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Most Sixes in IPL Chennai Super Kings Captains Sanju Samson Breaks David Warner Record, Now Mission AB de Villiers  | Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात

Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात संजू सॅमसन जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याच्या उल्लेखनीय कामगिरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दिल्लीविरुद्ध काल खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याने उत्कृष्ट खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात सॅमसनने अवघ्या ५२ चेंडूत ८७ धावांची झंझावाती खेळी करत सात चौकार आणि सहा षटकार ठोकले. या कामगिरीसह सॅमसनने आयपीएलमधील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत आपले नाव नोंदवले असून डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे.  

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल एकूण ३५७ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा (३१७ षटकार) दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली (३०६ षटकार) तिसऱ्या आणि महेंद्रसिंह धोनी चौथ्या क्रमांकावर (२६४ षटकार) चौथ्या स्थानावर आहेत. पाचव्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स असून त्याच्या नावावर २५१ षटकारांची नोंद आहे. तर, संजू समसन २४० षटकारांसह सहाव्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसन सध्या एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडण्यापासून केवळ १२ षटकार दूर आहे.

एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात

यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत २१ षटकार ठोकले असून त्याचा आक्रमक खेळ पाहता हा टप्पा लवकरच पार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चेन्नईच्या संघाला अजून चार सामने खेळायचे असून संघ जर प्लेऑफमध्ये पोहोचला, तर सॅमसनला आणखी सामने खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे येत्या काही सामन्यांत तो एबी डिव्हिलियर्सलाही मागे टाकत नवीन विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी

आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईला आणखी ४ सामने खेळायचे आहे. चेन्नईला त्यांचे पुढील दोन सामने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचे आहेत. त्यानंतर चेन्नईचा संघ सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्याशी भिडणार आहे. प्लेऑफचे तिकिट निश्चित करण्यासाठी चेन्नईच्या संघाला पुढील चारही सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. 

Web Title : संजू सैमसन की तूफानी फॉर्म: एबी डिविलियर्स के आईपीएल रिकॉर्ड पर नज़र

Web Summary : संजू सैमसन का आईपीएल में शानदार प्रदर्शन जारी है, छक्कों में डेविड वार्नर को पीछे छोड़ा। एबी डिविलियर्स का रिकॉर्ड तोड़ने के करीब। आगे और मैचों के साथ, एक नया मील का पत्थर पहुंच के भीतर है। चेन्नई सुपर किंग्स को प्लेऑफ स्थान सुरक्षित करने के लिए जीत की जरूरत है।

Web Title : Sanju Samson's Blazing Form: Chasing AB de Villiers' IPL Record

Web Summary : Sanju Samson's explosive IPL form continues, surpassing David Warner in sixes. He's close to overtaking AB de Villiers' record. With more matches ahead, a new milestone is within reach. Chennai Super Kings need wins to secure a playoff spot.