नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:10 IST2026-05-06T13:09:57+5:302026-05-06T13:10:37+5:30

टीव्हीकेला बहुमतासाठी १० जागांची गरज आहे. त्यात काँग्रेसच्या ५ आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे.

Good news for Thalapathy Vijay in Tamil Nadu: In addition to the Congress, AIADMK MLAs are now also likely to extend their support | नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News

नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News

चेन्नई - एखाद्याचे नशीब असावे तर थलापती विजयसारखे...सिनेमातून राजकारणात नव्याने आले अन् तामिळनाडूत राजकीय पक्ष टीव्हीके स्थापन केला. अवघ्या २ वर्षाच्या मेहनतीच्या बळावर थलापती विजय यांनी मोठमोठ्या राजकीय दिग्गजांना पाणी पाजले आहे. आता अभिनेता विजय टीव्हीकेचे सरकार स्थापन करणार आहे. तामिळनाडूत सरकार स्थापन करण्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. टीव्हीके बहुमताचा आकडा पार करून मजबूत सरकार आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अखेर टीव्हीकेला कोण कोण पाठिंबा देणार हा प्रश्न आहे. परंतु अभिनेता विजयसाठी समोरून गुड न्यूज आली आहे.

टीव्हीकेला बहुमतासाठी १० जागांची गरज आहे. त्यात काँग्रेसच्या ५ आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. त्याशिवाय एआयडिएमकेच्या काही आमदारांनी थलापती विजय यांना समर्थन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एखाद्याला तहान लागली असताना त्याला विहिर दिसावी असा हा प्रकार आहे. टीव्हीके राज्यात सर्वात मोठा पक्ष बनला आहे परंतु बहुमत पार करण्यासाठी त्यांना आणखी काही आमदारांना सोबत घ्यावे लागणार आहे. त्यातूनच टीव्हीकेचे राज्यात सरकार येऊ शकते. त्यात एआयडिएमकेचे राज्यसभा नेते सी. व्ही. षण्मुगम यांच्या नेतृत्वात दोन तृतीयांश आमदार बंडखोरीच्या तयारीत आहेत. या आमदारांना थलापती विजय यांच्यासोबत जायचे आहे. त्यामुळे एआयडिएमकेमध्ये फुटीचे संकेत मिळत आहेत.

एआयएडीएमकेचे सुमारे ३५ आमदार चेन्नईतील राज्यसभा नेते सी. व्ही. षण्मुगम यांच्या कार्यालयात दाखल झाले. ही संख्या नवीन तामिळनाडू विधानसभेतील पक्षाच्या एकूण संख्याबळाच्या दोन-तृतीयांश आहे. एआयएडीएमकेचे राज्यसभा नेते सी. व्ही. षण्मुगम यांनी मायालम मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. या आमदारांनी एआयएडीएमकेचे सरचिटणीस के. पलानीस्वामी यांना टीव्हीकेसोबत युती करण्याचा विचार करण्याची विनंती केली आहे. टीव्हीकेला बहुमतासाठी १० जागांची कमतरता भासली आहे. एआयडिएमकेचे आमदार पक्षाच्या भूमिकेविरोधात जात टीव्हीकेसोबत जाणार की हायकमांड त्यांची मागणी मान्य करणार याबाबत आता काहीच सांगणे शक्य नाही. मात्र थलापती विजय यांच्या सरकारसाठी लागणारे बहुमत यातून पूर्ण होऊ शकते ती टीव्हीकेसाठी आनंदाची बातमी आहे.

दरम्यान, टीव्हीकेसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय हायकमांड घेईल असं सांगत एआयएडीएमकेचे प्रवक्ते कोवाई सत्यन यांनी पक्षात फूट पडण्याची शक्यता फेटाळून लावली. टीव्हीकेने कोणत्याही पक्षाला आमंत्रित केलेले नाही. जर त्यांना स्थिरता हवी असेल तर त्यांना निर्णय घ्यावा लागेल. निश्चितच काहीतरी हालचाल सुरू आहे. आपण वाट पाहू आणि बघू असं त्यांनी म्हटलं. थलापती विजय लवकरच चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतील अशी शक्यता आहे. टीव्हीके सध्या ११८ चा मॅजिक फिगर गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Web Title : थलपति विजय की किस्मत चमकी: TVK की जीत और खुशखबरी!

Web Summary : अभिनेता विजय की टीवीके पार्टी की नजर तमिलनाडु सरकार बनाने पर। कांग्रेस और एआईएडीएमके के गुट टीवीके का समर्थन कर सकते हैं, जिससे गठबंधन की संभावना है। एआईएडीएमके ने विभाजन से इनकार किया लेकिन टीवीके का लक्ष्य बहुमत हासिल करना है, विजय संभवतः सीएम बनेंगे।

Web Title : Thalapathy Vijay's luck shines: TVK victory and good news!

Web Summary : Actor Vijay's TVK party eyes Tamil Nadu government formation. Congress and AIADMK factions may support TVK, potentially leading to a coalition. AIADMK denies any split but TVK aims to secure a majority, with Vijay possibly becoming CM.