Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:51 IST2026-05-06T12:44:27+5:302026-05-06T12:51:34+5:30

Numerology: अंकशास्त्रात (Numerology) प्रत्येक अंकाची एक वेगळी ऊर्जा असते. काही अंक हे विशेषतः समृद्धी, सुख आणि स्थिरतेचे कारक मानले जातात. जर तुमच्या पत्नीचा जन्मदिनांक विशिष्ट मुलांकावर आधारित असेल, तर ती केवळ तुमची जीवनसाथीच नाही, तर घरासाठी भाग्याची आणि समृद्धीची गुरुकिल्ली ठरू शकते.

अंकशास्त्रानुसार पुढील मुलांक असणाऱ्या स्त्रिया घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतात. एवढेच नाही तर तुमच्या आयुष्यात त्यांच्या येण्याने राजयोगाची संधी आपोआप चालून येते असे म्हटले जाते. याबाबत तुमचा अनुभव काय आहे ते पुढील मूलांकावरून तपासून पाहा.

अनेकांना वाटते की समृद्धी केवळ भाग्याने मिळते, पण अंकशास्त्रानुसार आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींची ऊर्जाही आपल्या प्रगतीवर मोठा परिणाम करते. जर तुमच्या पत्नीचा 'मुलांक' (जन्मतारीख) खालीलपैकी एक असेल, तर तुमच्या घरात सुख-समृद्धीचा वास नैसर्गिकरित्या असतो.

ज्या स्त्रियांची जन्म तारीख २/११/२०/२९ असते त्यांचा मुलांक २ असतो, त्या स्वभावाने अत्यंत शांत आणि समजूतदार असतात. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात भावनिक स्थिरता राहते. त्यांचा अंतरात्मा (Intuition) खूप प्रबळ असतो, ज्यामुळे त्या कुटुंबाला येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना देऊन सुरक्षित ठेवतात.

ज्या स्त्रियांची जन्म तारीख ५/१४/२३ असते त्यांचा मुलांक ५ असणाऱ्या स्त्रिया अत्यंत बुद्धिमान आणि चपळ असतात. त्या घरामध्ये नवीन संधी आणि प्रगतीचे मार्ग घेऊन येतात. त्यांची निर्णयक्षमता अचूक असते, ज्यामुळे आर्थिक बाबतीत कुटुंबाला मोठा फायदा होतो. या स्त्रिया घराची 'वाइब' नेहमी उत्साही ठेवतात.

ज्या स्त्रियांची जन्म तारीख ६/१५/२४ असते त्यांचा अंकशास्त्रात ६ हा अंक शुक्राचा मानला जातो. ज्या पत्नीचा मुलांक ६ आहे, त्या घराला नंदनवन बनवतात. त्यांच्यामुळे घरात चैनीच्या वस्तू, प्रेम आणि आपुलकी वाढते. या स्त्रिया कुटुंबाची खूप काळजी घेतात आणि त्यांच्या नशिबामुळे घरात कधीही वैभवाची कमतरता भासत नाही.

ज्या स्त्रियांची जन्म तारीख ८/१७/२६ असते त्यांचा मुलांक ८ हा कष्टाचा आणि मोठ्या यशाचा कारक आहे. ज्या स्त्रियांचा मुलांक ८ असतो, त्या घराचे 'वेल्थ कर्मा' (Wealth Karma) मजबूत करतात. त्यांच्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थिरता येते आणि गुंतवणुकीत मोठे यश मिळते. त्या कुटुंबाला शिस्त आणि दीर्घकालीन समृद्धीकडे घेऊन जातात.

जर तुमच्या पत्नीचा मुलांक यापैकी एक असेल, तर तुमच्या प्रगतीत त्यांचा अदृश्य पण मोठा वाटा आहे. त्यांच्या सकारात्मक ऊर्जेचा सन्मान करा आणि घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा, ज्यामुळे ही समृद्धी अधिक पटीने वाढेल.