पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 07:41 IST2026-05-06T07:38:07+5:302026-05-06T07:41:09+5:30

Pakistan Navy Indian Crew Rescue:

Pakistan Navy sends Kashmir ship for help video! 7 Indian sailors stranded in Arabian Sea rescued | पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत

पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत

इस्लामाबाद: अरबी समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे भरकटलेल्या एका भारतीय जहाजाला पाकिस्तान नौदलाने मदतीचा हात दिला आहे. 'एमव्ही गौतम' असे या जहाजाचे नाव असून, त्यावरील सहा भारतीय आणि एका इंडोनेशियन अशा एकूण ७ कर्मचाऱ्यांची मदत करण्यात आली आहे.

हे जहाज ओमानहून भारताकडे येत असताना अरबी समुद्रात त्यात 'गंभीर तांत्रिक बिघाड' झाला. यानंतर मुंबईतील 'मेरिटाइम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर'ने धोक्याचा इशारा जारी केला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत पाकिस्तान मॅरिटाइम सिक्युरिटी एजन्सीच्या 'काश्मीर' या जहाजाने तातडीने बचाव मोहीम राबवली.

अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवली
पाकिस्तान नौदलाने दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या पथकाने जहाजावरील खलाशांना तातडीने अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवल्या. तसेच, जहाजातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक मदतही दिली. "समुद्रातील मानवी जीव वाचवण्यासाठी आणि आपल्या सागरी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, मग ती व्यक्ती कोणत्याही देशाची असो," असे पाकिस्तान नौदलाने म्हटले आहे.

संघर्षाच्या वर्षपूर्तीनंतरचे दिलासादायक चित्र
विशेष म्हणजे, मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांच्या माध्यमातून चार दिवसांचा मर्यादित संघर्ष झाला होता. या घटनेला बरोबर एक वर्ष पूर्ण होत असतानाच, समुद्रात मात्र दोन्ही देशांच्या यंत्रणांमध्ये मानवतावादी दृष्टीकोनातून सहकार्य पाहायला मिळाले आहे.

Web Title : पाकिस्तान नौसेना ने अरब सागर में फंसे भारतीय जहाज की मदद की, चालक दल को बचाया।

Web Summary : पाकिस्तान नौसेना के जहाज 'कश्मीर' ने अरब सागर में तकनीकी खराबी का सामना कर रहे भारतीय जहाज 'एमवी गौतम' से सात चालक दल के सदस्यों (छह भारतीय, एक इंडोनेशियाई) को बचाया। उन्होंने मुंबई के समुद्री बचाव समन्वय केंद्र से संकटकालीन कॉल का जवाब देते हुए भोजन, चिकित्सा सहायता और तकनीकी सहायता प्रदान की।

Web Title : Pakistan Navy aids Indian ship stranded in Arabian Sea, saves crew.

Web Summary : The Pakistan Navy's 'Kashmir' ship rescued seven crew members (six Indian, one Indonesian) from the Indian ship 'MV Gautam,' which faced technical issues in the Arabian Sea. They provided food, medical assistance, and technical support, responding to a distress call from Mumbai's Maritime Rescue Coordination Center.