तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 07:50 IST2026-05-06T07:45:37+5:302026-05-06T07:50:35+5:30

टीवीकेला सशर्त पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या व्हर्चुअल बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. काँग्रेसचे आमदार टीवीकेसोबत सत्तेत जाण्यास तयार आहेत.

Power formation in Tamil Nadu is gaining momentum, the Thalapathy Vijay will be CM; Congress Ready to support, but what is the condition? | तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?

तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?

चेन्नई - तामिळनाडूत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून अभिनेता विजय यांच्या टीवीके पक्षाने इतिहास रचला आहे. टीवीके बहुमताचा आकडा पार करू शकला नाही परंतु राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यातच काँग्रेसने टीवीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, तामिळनाडूकाँग्रेस नेत्यांची व्हर्चुअल बैठक पार पडली. त्यात झालेल्या चर्चेत टीवीकेला पाठिंबा देण्याबाबत एकमत झाले. परंतु त्याबदल्यात काँग्रेसला काही मंत्रि‍पदे हवीत. काँग्रेस तामिळनाडू सरकारमध्ये २ मंत्रि‍पदाची मागणी करू शकते. त्याशिवाय महामंडळे, आयोगाचे अध्यक्षपदही काँग्रेसकडून मागितले जाईल. या बैठकीत ज्या मुद्द्यांवर सहमती झाली त्याबाबत लवकरच काँग्रेस हायकमांडला अहवाल पाठवण्यात येणार आहे. काँग्रेस नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर टीवीकेसोबत आघाडीचा निर्णय जाहीर होईल.

टीवीकेला सशर्त पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या व्हर्चुअल बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. काँग्रेसचे आमदार टीवीकेसोबत सत्तेत जाण्यास तयार आहेत. त्याबाबत पाठिंबा पत्रही टीवीकेला दिले जाईल. त्यानंतर काँग्रेस आमदार टीवीके प्रमुख विजय यांची भेट घेतील. या पाठिंब्याबाबत टीवीकेलाही कळवण्यात आले आहे. याआधी तामिळनाडू सरकारच्या स्थापनेसाठी विजय यांनी चेन्नईच्या त्यांच्या निवासस्थानी विजयी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विजय यांनी संभाव्य कॅबिनेट खात्यांबाबत चर्चा केली. त्यात काही नावे समोर आली आहेत. ज्यात एन.आनंद, अरुणराज, सेंगोट्टैयन, अधव अर्जुना, सीटीआर निर्मलकुमार, मारिया विल्सन, राजमोहन, वीएस बाबू आणि जेसीडी प्रभाकर यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, टीवीकेच्या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी प्रमुख नेते विजय यांची निवड करण्यात आली. त्यानंतर टीवीकेने राज्यपालांनाही पत्र पाठवून त्यांची वेळ मागितली आहे. काँग्रेसच्या ५ आमदारांनी टीवीकेसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तामिळनाडूत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून ७ मे गुरुवारी थलापती विजय हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत एकूण ९ जण मंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. तामिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सत्ताधारी डिएमके पक्षाला नव्या राजकीय पक्षाने सत्तेतून बाहेर काढले आहे. डीएमकेला या निवडणुकीत केवळ ५९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. 

Web Title : विजय बनेंगे तमिलनाडु के मुख्यमंत्री; कांग्रेस समर्थन, शर्तें लागू।

Web Summary : अभिनेता विजय की टीवीके पार्टी ने तमिलनाडु में 108 सीटें जीतीं। कांग्रेस ने समर्थन की पेशकश की, दो मंत्री पद और निगमों के अध्यक्ष पद की मांग की। विजय नेता चुने गए, राज्यपाल से मिलने का समय मांगा। शपथ ग्रहण 7 मई को होने की संभावना, डीएमके का शासन समाप्त।

Web Title : Vijay to be Tamil Nadu CM; Congress support with conditions.

Web Summary : Actor Vijay's TVK party won 108 seats in Tamil Nadu. Congress offers support, demanding two ministerial positions and chairmanship of corporations. Vijay elected leader, seeks governor's appointment. Swearing-in likely May 7th, ending DMK's rule.