अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:26 IST2026-05-06T12:25:24+5:302026-05-06T12:26:16+5:30

जुळ्या बहि‍णींच्या आईने जेम्स नावाच्या एका व्यक्तीला त्यांचे वडील असल्याचं सांगितले होते. परंतु ते कधीच त्यांच्यासोबत राहत नव्हते.

Twin daughters from the same mother, but both have different fathers; Sensational revelation from DNA report | अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

कधीकधी निसर्ग असे काही चमत्कार करतो ज्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. ब्रिटनमधील नॉटिंगहॅम येथे राहणाऱ्या दोन बहिणींना गेल्या ५० वर्षांपासून आपण जुळ्या आहोत असे वाटत होते. परंतु एका डीएनए रिपोर्टने त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ उभे राहिले. या दोघी जुळ्या आहेतच परंतु त्यांचे जैविक वडील वेगवेगळे असल्याचं समोर आले. हे ऐकून तुम्हालाही विश्वास होणार नाही. हे कसं शक्य असेल असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला पुढे कळेल.

जवळपास ५० वर्ष मिशेल आणि लाविनिया ओसबोर्न या दोघींनी प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांची साथ दिली. परंतु दोघींना मनात कायम त्यांच्या वडिलांविषयी शंका असायची. हेच जाणून घेण्यासाठी दोघींनी DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात वादळ आले. या रिपोर्टमध्ये त्यांची आई एकच आहे मात्र वडील वेगवेगळे असल्याचा खुलासा झाला. 

या दुर्मिळ प्रकाराला वैद्यकीय भाषेत Heteropaternal Superfecundation असं म्हणतात. जेव्हा महिलेच्या शरीरात एकाचवेळी २ अंडी रिलीज होतात. कमी कालावधीत दोन पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवल्याने वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे अंड्यांचे फलन होऊ शकते, तेव्हाच असे घडू शकते. संपूर्ण जगात आतापर्यंत केवळ २४ अशी उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. ब्रिटनमध्ये ही पहिलीच केस आहे. 

जुळ्या बहि‍णींना कधी आला संशय?

जुळ्या बहि‍णींच्या आईने जेम्स नावाच्या एका व्यक्तीला त्यांचे वडील असल्याचं सांगितले होते. परंतु ते कधीच त्यांच्यासोबत राहत नव्हते. अनेक वर्षांनी जेव्हा मिशेलने जेम्स यांचा फोटो पाहिला तेव्हा आपला चेहरा वडिलांशी जुळत नाही तेव्हा तिला संशय आला. त्यानंतर मिशेलने डिएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या अहवालात जेम्स तिचे वडील नाहीत हे समोर आले. मात्र ज्यादिवशी मिशेलला तिच्या डिएनए चाचणीचे रिपोर्ट मिळाले त्याचदिवशी तिच्या आईचे निधन झाले. त्यामुळे अनेक रहस्य तशीच राहिली. त्यामुळे मिशेलचे खरे वडील कोण हे गूढ कायमचे तसेच राहणार आहे. 
 

Web Title : जुड़वां बहनें, एक माँ, अलग पिता: डीएनए रिपोर्ट से चौंकाने वाला खुलासा!

Web Summary : ब्रिटेन में जुड़वां बहनों को डीएनए परीक्षण से पता चला कि उनके जैविक पिता अलग-अलग हैं। हेटरोपैटर्नल सुपरफेकंडेशन नामक यह दुर्लभ घटना तब होती है जब दो अंडे अलग-अलग पुरुषों के शुक्राणुओं द्वारा निषेचित होते हैं। विश्व स्तर पर यह केवल 24वां मामला है।

Web Title : Twin sisters, same mother, different fathers: DNA report reveals shocker!

Web Summary : Twin sisters in Britain discovered they have different biological fathers through a DNA test. This rare phenomenon, called Heteropaternal Superfecundation, occurs when two eggs are fertilized by different men's sperm. It's only the 24th such case globally.