काँग्रेसकडून शेतकरी, कामगार विधेयकाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:00 AM2020-10-03T05:00:00+5:302020-10-03T05:00:41+5:30

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाच्या तीव्र शब्दात विरोध केला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची मुजोरीची आहे. कृषी विधयके देशातील शेतकऱ्यांना मातीत घालणारी असल्याने शेतकऱ्यांना याचा प्रखर विरोध करावा, असे आवाहन यावेळी केले. खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत मोदी सरकारने राज्यसभेत पारित न होणारे विधेयक सहा खासदारांना निलंबित करून डाव साधल्याचा आरोप यावेळी केला आहे.

Farmers oppose Labor Bill from Congress | काँग्रेसकडून शेतकरी, कामगार विधेयकाचा विरोध

काँग्रेसकडून शेतकरी, कामगार विधेयकाचा विरोध

Next
ठळक मुद्देचंद्रपुरात धरणे : राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याने निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले विधेयक शेतकरी व कामगारांच्या मुळावर उठणारे असल्याचा आरोप करून काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी महात्मा गांधी जयंतीदिनी चंद्रपूर, वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी येथे आंदोलनाद्वारे निषेध नोंदविण्यात आला. हाथरस येथील महिला अत्याचार व काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियं, का गांधी यांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. ब्रह्मपुरीत टायरची जाळपोळ करून निषेध नोंदविण्यात आला.
चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक किशोर गजभिये, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, विनोद दत्तात्रय, युसूफ भाई, के. के. सिंग, हारून भाई, मलक शाकीर, महाराष्ट अनुसूचित जाती उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, ओ. बी. सी जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, किसान कॉंग्रेस अध्यक्ष रोशन पचारे, भालचंद्र दानव, नगरसेवक निलेश खोब्रागडे, नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनीता लोढिया आदी उपस्थित होते.

कृषी विधेयके शेतकऱ्यांना मातीत घालणारी
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाच्या तीव्र शब्दात विरोध केला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची मुजोरीची आहे. कृषी विधयके देशातील शेतकऱ्यांना मातीत घालणारी असल्याने शेतकऱ्यांना याचा प्रखर विरोध करावा, असे आवाहन यावेळी केले. खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत मोदी सरकारने राज्यसभेत पारित न होणारे विधेयक सहा खासदारांना निलंबित करून डाव साधल्याचा आरोप यावेळी केला आहे.

Web Title: Farmers oppose Labor Bill from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.