Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
By कोमल खांबे | Updated: May 3, 2026 08:57 IST2026-05-03T08:57:07+5:302026-05-03T08:57:37+5:30
दोन दिवसांतच रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक सिनेमातून छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. दोन दिवसांतच रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'राजा शिवाजी' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल १२.४० कोटींचा गल्ला जमवला. या कमाईसह 'राजा शिवाजी' मराठी सिनेमातील आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा ओपनिंग डे ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही सिनेमाने घसघशीत कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या दिवशी १०.५५ कोटींचा बिजनेस 'राजा शिवाजी'ने केला आहे. त्यामुळे दोनचं दिवसांत सिनेमाची कमाई २२.९५ कोटी इतकी झाली आहे.
‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटाविषयी सांगायचं तर, भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित आणि अनुभवी कलाकारांचा सहभाग आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या कलाकारांनी या ऐतिहासिक कथानकाला आपला भव्य कलात्मक आधार दिला आहे. विशेष म्हणजे रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले असून, त्यांच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प अधिक भव्य स्वरूपात साकारला गेला आहे.