'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 09:41 IST2026-05-03T09:40:25+5:302026-05-03T09:41:47+5:30

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी भारत (बीएच) मालिका नोंदणी लागू केली आहे, ज्याची अंमलबजावणी १५ सप्टेंबर २०२१ पासून करण्यात आली आहे.

Took 'BH' series number, but forgot to pay tax! Vehicle owners in Mumbai face fine of lakhs of rupees | 'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड

'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड

मुंबई: नोकरी, व्यवसाय अथवा पर्यटनानिमित्त सतत परराज्यात प्रवास करणाऱ्यांसाठी आरटीओने 'बीएच' (भारत) सीरीज सुरू केली आहे. 'बीएच'साठी दर दोन वर्षांनी रोड टॅक्स भरावा लागतो, अन्यथा प्रतिदिन १०० रुपये दंड आकारला जातो. मुंबईतील ताडदेव, बोरिवली आणि अंधेरी आरटीओ कार्यालयांमध्ये १० हजारपेक्षा जास्त 'बीएच' सिरीजची वाहने नोंद झालेली असून त्यापैकी अनेक वाहनधारकांनी टॅक्स न भरल्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा दंड बसला आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी भारत (बीएच) मालिका नोंदणी लागू केली आहे, ज्याची अंमलबजावणी १५ सप्टेंबर २०२१ पासून करण्यात आली आहे. 'बीएच' मालिकेअंतर्गत नोंदणी झालेल्या वाहनाच्या मालकाला दर दोन वर्षांनी ज्या राज्यात तो आहे, तेथील अधिसूचित दरापेक्षा २५ टक्के जास्त दराने वाहन कर भरावा लागतो.

अशा वाहनांच्या हस्तांतरणाशी संबंधित आरटीओवरील भारही हलका होतो. परंतु २ वर्षांनी कर नाही भरला तर दर दिवशी १०० रुपयेप्रमाणे वार्षिक कर न भरल्यास वर्षाला ३६ हजार दंड लागू होतो.

आरटीओ नोंदणी झालेली वाहने
बोरीवली ३,३२६
५००
अंधेरी २९०९
मुंबई सेंट्रल ४,२७०

बीएच सिरीजसाठी कोण अर्ज करू शकतो?

राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी.
प्रशासकीय कर्मचारी, चार किंवा 3 अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांचे कर्मचारी.
३५००

एकूण १०,
१५००
२५००
परराज्यात बदली होणाऱ्यांना फायदा

'बीएच' सिरीजमुळे परराज्यात बदली होणाऱ्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होतो. त्यांना प्रत्येक राज्य बदलल्यानंतर वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता राहत नाही, ज्यामुळे वेळ आणि खर्च वाचतो.

अर्ज कसा करणार?

'मॉर्थ' वाहन पोर्टलवर लॉगिन करा. फॉर्म २० भरावा, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी फॉर्म ६०, वर्क सर्टिफिकेट आणि कर्मचारी ओळखपत्राची प्रत जमा करावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. ऑनलाइन मोटर वाहन कर भरा.

Web Title : बीएच सीरीज नंबर लिया, कर भरना भूले! मुंबई में वाहन मालिकों पर लाखों का जुर्माना

Web Summary : मुंबई में बीएच सीरीज के वाहन मालिकों पर रोड टैक्स का भुगतान न करने पर जुर्माना लगा। अंतरराज्यीय यात्रियों के लिए शुरू की गई बीएच सीरीज के लिए द्विवार्षिक कर भुगतान आवश्यक है। भुगतान में विफलता के परिणामस्वरूप ₹100 का दैनिक जुर्माना लगता है।

Web Title : BH Series Number Acquired, Tax Payment Forgotten! Mumbai Vehicle Owners Fined Lakhs

Web Summary : Mumbai BH series vehicle owners face fines for unpaid road tax. The BH series, launched for inter-state travelers, requires bi-annual tax payments. Failure to pay results in a daily fine of ₹100.