Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 09:50 IST2026-05-03T09:49:03+5:302026-05-03T09:50:45+5:30
Delhi Residential Building Fire: दिल्लीतील विवेक विहार भागात एका रहिवासी इमारतीत मध्यरात्री एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीररित्या भाजले आहेत.

Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
दिल्लीतील विवेक विहार भागात एका रहिवासी इमारतीत मध्यरात्री एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीररित्या भाजले आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली असून घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये मध्यरात्री एसीचा स्फोट झाल्याने आग लागली. आगीच्या ज्वाळा तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचताच, फ्लॅटमधील रहिवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी टेरेसच्या दिशेने धाव घेतली. परंतु, टेरेसचा दरवाजा आतून बंद असल्याने अनेकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावर उपस्थित असलेल्या चार व्यक्तींचाही या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला. तर, एका पलंगावर तीन मृतदेह आढळून आले. या दुर्घटनेतील मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन नियंत्रण कक्षाला पहाटे ३:४७ च्या सुमारास सूचना मिळाली. त्यानंतर अग्निशमनदलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ४ जण गंभीररित्या भाजले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.