Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 10:02 IST2026-05-03T10:00:21+5:302026-05-03T10:02:10+5:30

Delhi Vivek Vihar Fire : दिल्लीतील विवेक विहार येथील 'बी' ब्लॉक मधील एका इमारतीला काल रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Delhi Vivek Vihar Fire eyewitness told what happened after fire | Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

दिल्लीतील विवेक विहार येथील 'बी' ब्लॉक मधील एका इमारतीला काल रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या मागील बाजूला वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणारं कुटुंब आग लागल्यानंतर बाहेर पडू शकलं नाही. कदाचित आग इतकी भीषण आहे, याची कल्पना त्यांना वेळेत आली नसावी. जर आग लागल्यानंतर सुरुवातीला ज्यांना वाचवण्यात आलं, त्यांनी मागील बाजूच्या फ्लॅटमधील लोकांना फोन करून सतर्क केलं असतं, तर कदाचित लोकांचा जीव वाचला असता.

प्रत्यक्षदर्शी चरणजीत सिंह यांनी सांगितलं की, "आतापर्यंत अग्निशमन दलाच्या १० गाड्या येथे आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाल्कनीला शिडी लावून सुमारे २० लोकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. मात्र, इमारतीच्या टॉप फ्लोअरच्या मागील बाजूला असलेल्या २ फ्लॅटमधील लोक बाहेर पडू शकले नाहीत. यात थोडीशी चूक अशी झाली की, समोरच्या बाजूच्या फ्लॅटमधून ज्यांना बाहेर काढलं गेलं, त्यांनी इतर लोकांनाही इमारतीला आग लागल्याची माहिती देऊन सतर्क करायला हवं होतं, जेणेकरून ते लोकही वेळेत बाहेर पडू शकले असते."

एसी ब्लास्ट अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

"रात्री साडेतीनच्या सुमारास इमारतीला आग लागली. असं वाटतं की आग लागली तेव्हा मागील बाजूच्या फ्लॅटमधील लोक झोपले होते. या संपूर्ण इमारतीत एकूण ८ फ्लॅट आहेत. टॉप फ्लोअरच्या २ फ्लॅटमधील कुटुंबं बाहेर पडू शकली नाहीत, ते अजूनही आतच आहेत." प्राथमिक तपासानुसार, एसीमध्ये (AC) झालेल्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

आगीत ९ जणांचा मृत्यू

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात या आगीच्या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आग दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागली होती. आग विझवण्याच्या कार्यादरम्यान इमारतीतून १०-१५ लोकांना वाचवण्यात आलं, ज्यापैकी दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गुरु तेग बहादूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. DDMA कर्मचारी, वाहतूक अधिकारी आणि स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी तैनात आहेत.

Web Title : दिल्ली आग: 9 की मौत; क्या जानें बचाई जा सकती थीं?

Web Summary : दिल्ली के विवेक विहार में आग लगने से नौ लोगों की मौत हो गई। एक गवाह ने कहा कि निवासियों को पहले सचेत करने से जान बचाई जा सकती थी। एसी विस्फोट का संदेह।

Web Title : Delhi Fire: 9 Dead; Could Lives Have Been Saved?

Web Summary : A fire in Delhi's Vivek Vihar killed nine. A witness said alerting residents sooner could have saved lives. AC blast suspected.