"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम

By कोमल खांबे | Updated: May 3, 2026 09:38 IST2026-05-03T09:37:49+5:302026-05-03T09:38:17+5:30

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नरसापूर प्रकरणावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया पोस्टमधून त्यांनी बलात्कार करणाऱ्या नराधामाचा एन्काऊंटर करण्याची मागणी करत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. 

pune narsapur rape case marathi actor pravin tarde angry reaction ask to give hang till death punishment | "त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम

"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम

पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे ४ वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करत निर्घुणपणे तिचा खून केला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या प्रकरणाचा निषेध केला आहे. आरोपीला तातडीने शिक्षा सुनावण्याची मागणी महाराष्ट्रातून केली जात आहे. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या प्रकरणावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया पोस्टमधून त्यांनी बलात्कार करणाऱ्या नराधामाचा एन्काऊंटर करण्याची मागणी करत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. 

प्रवीण तरडेंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन या प्रकरणाबाबत पोस्ट शेअर केली आहे. "उद्या त्या नराधामाचे एन्काऊंटर झाले तरच मानू की हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे. अन्यथा भोर-वेल्हा-मुळशीच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा", असं म्हणत प्रवीण तरडेंनी पोस्टमधून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटमध्ये संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. 


नक्की काय घडले?

उन्हाळ्याच्या सुटीसाठी चिमुकली आजीकडे आली होती. दरम्यान शुक्रवारी नराधमाने तिला आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्याकडे नेले. ४ वाजेपर्यंत मुलगी घरी परत न आल्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. त्याचवेळी गावातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात आरोपी मुलीला घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेतला आणि बनेश्वर फाट्यावरून पकडून आणून चोप दिला. चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवून ठेवलेली जागा सांगितली. २ शेणाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह पुरला होता. चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.

आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे दोन गुन्हे

भीमराव प्रभाकर कांबळे (६५) हा मूळचा भोर तालुक्यातील साळवडे येथील रहिवासी आहे. साळवडे गावाने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गावाबाहेर काढले होते. तो नसरापूर बाजारपेठेच्या ठिकाणी मोलमजुरीसाठी येत असे. आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे दोन गुन्हे दाखल आहेत. १९९८ आणि २०१५ साली बलात्काराचे गुन्हे दाखल असून आरोपीने ४ वर्षे कारावास भोगला आहे. सध्या कुणाच्या बांधकामावर, तर कोणाच्या शेतात मोलमजुरी करीत असे. या घटनेप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.

Web Title : नरसपुर घटना पर प्रवीण तरडे ने बलात्कारी के एनकाउंटर की मांग की।

Web Summary : अभिनेता प्रवीण तरडे ने नरसपुर बलात्कार मामले में बलात्कारी के एनकाउंटर की मांग की, सरकार पर कार्रवाई का दबाव। 4 वर्षीय बच्ची की क्रूर हत्या से आक्रोश।

Web Title : Pravin Tarde demands encounter for rapist in Narsapur incident.

Web Summary : Actor Pravin Tarde demands encounter of Narsapur rapist, threatening action if government fails. Outrage erupts after 4-year-old brutally murdered; pressure mounts for justice.