राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 05:38 IST2026-05-03T05:37:23+5:302026-05-03T05:38:06+5:30

मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून, मुलांची ८६.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुली या मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे राज्यात दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

Konkan is the only state in trouble; Latur is at the bottom again! Class 12th results fall | राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला

राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/मुंबई :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी दुपारी १२ वाजता ऑनलाइन जाहीर केला. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात २.०९ टक्के घट झाली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून, मुलांची ८६.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुली या मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे राज्यात दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के इतका लागला असून सर्वात कमी राहिला आहे.

शाखानिहाय निकाल

विज्ञान
८६.४४%
कला
७८.०२%
वाणिज्य
८७.०३%
व्यवसाय अभ्यासक्रम
८२.७४%
आयटीआय
८३.७८%
२६ विषयांचा निकाल १००%

राज्य मंडळाने एकूण १५३ विषयांसाठी परीक्षा घेतली. यापैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बहुतांश शाखांमध्ये थोडी घसरण झाली असून, कला शाखेचा निकाल तुलनेने कमी राहिला आहे.

यंदाचा निकाल
- ८९.७९%
गतवर्षीचा निकाल
- ९१.८८%
घट
२.०९%
विभागनिहाय निकाल
कोकण
९४.१४%
पुणे
९१.२५%
अमरावती
२०.९२%
नाशिक
९०.७२%
मुंबई
९०,०८%
कोल्हापूर
८९.९७%
छत्रपती संभाजीनगर
८८.६८%
नागपूर
८८.६७%
लातूर
८४.१४%
उत्तरपत्रिका तपासणीसाठी ३ मे ते १७ मेपर्यंत मुदत बारावीच्या निकालानंतर गुण पडताळणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ३ ते १७ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती राज्य परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. निकालानंतर नवी मुंबईतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा असा जल्लोष केला.

Web Title : राज्य में कोंकण अव्वल; लातूर सबसे नीचे! 12वीं का नतीजा गिरा

Web Summary : महाराष्ट्र 12वीं का परिणाम 89.79% रहा, जो 2.09% की गिरावट है। लड़कियों ने लड़कों को 6.35% से बेहतर प्रदर्शन किया। दो छात्रों ने 100% अंक प्राप्त किए। कोंकण 94.14% के साथ शीर्ष पर, जबकि लातूर 84.14% के साथ सबसे नीचे रहा। छात्र 3-17 मई तक सत्यापन के लिए ऑनलाइन आवेदन कर सकते हैं।

Web Title : Konkan shines in state; Latur at bottom! 12th result declined.

Web Summary : Maharashtra's 12th result is 89.79%, a 2.09% decrease. Girls outperformed boys by 6.35%. Two students scored 100%. Konkan topped with 94.14%, while Latur scored the lowest at 84.14%. Students can apply online for verification from May 3-17.