पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 03:59 IST2026-05-03T03:56:47+5:302026-05-03T03:59:37+5:30

West Bengal Re-polling in Falta constituency : दरम्यान २ मे रोजी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील १५ केंद्रांवर पुनर्मतदान झाले होते, मात्र आता संपूर्ण फालटा मतदारसंघातच फेरमतदान होणार आहे.

West Bengal Re-polling in Falta constituency, result date also changed Big decision of Election Commission | पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील फालटा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर पुन्हा एकदा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता ४ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांमध्ये फालटा मतदारसंघाचा समावेश नसेल. तथापी, उर्वरित २९३ जागांचे निकाल नियोजित वेळेनुसार लागतील. तर फालटा मतदारसंघाचा निकाल आता २४ मे रोजी जाहीर करण्यात येईल.

निवडणूक आयोगाची कारवाई -
फालटा मतदारसंघातील २८५ मुख्य केंद्रांसह सर्व सहाय्यक केंद्रांवर २१ मे २०२६ रोजी मतदान होईल. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत ही पुनर्मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, या मतदारसंघात गंभीर गुन्हे आणि लोकशाही प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचे प्रकार घडल्याने येथे पुन्हा मतदान घ्यावे लागत आहे.

ईव्हीएमवर भाजपच्या चिन्हा समोरील बटनावर लावला होता टेप - 
राज्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानादरम्यान फालटा येथून धक्कादायक प्रकार समोर आले होते. काही बूथवर ईव्हीएम मशिनवरील भाजपच्या चिन्हासमोरील बटनावर टेप लावण्यात आल्याचा आरोप भाजपने  केला होता. भाजपने याप्रकरणी तातडीने हस्तक्षेपाची मागणीही केली होती. 

या प्रकारानंतर, परिसरात निमलष्करी दलाची गस्त वाढवण्यात आली होती. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकींमुळे तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बलही तैनात करण्यात आले होते. दरम्यान २ मे रोजी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील १५ केंद्रांवर पुनर्मतदान झाले होते, मात्र आता संपूर्ण फालटा मतदारसंघातच फेरमतदान होणार आहे.

 

Web Title : पश्चिम बंगाल: फाल्टा में पुनर्मतदान, परिणाम तिथि बदली!

Web Summary : पश्चिम बंगाल के फाल्टा विधानसभा क्षेत्र में अनियमितताओं के कारण 21 मई, 2026 को पुनर्मतदान होगा। परिणाम 24 मई तक विलंबित। शेष 293 निर्वाचन क्षेत्रों के परिणाम 4 मई को घोषित किए जाएंगे। चुनाव आयोग ने ईवीएम में छेड़छाड़ के आरोपों के बाद पुनर्मतदान का आदेश दिया।

Web Title : West Bengal: Re-polling in Falta, Result Date Changed!

Web Summary : Due to reported irregularities, Falta assembly constituency will have re-polling on May 21, 2026. The result is delayed to May 24. Results for the remaining 293 constituencies will be declared on May 4 as scheduled, Election commission ordered re-polling after EVM tampering allegations.