नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 02:02 IST2026-05-03T01:59:45+5:302026-05-03T02:02:29+5:30
या संपूर्ण प्रकरणावर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. तसेच, आंदोलकांना हटवताना कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज करण्यात आला नाही," असे अमितेश कुमार यामनी म्हटले आहे.

नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण पुणे हादरले आहे. या दुर्दैवी घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ तीव्र आंदोलन केले. यामुळे परिसरात प्रचंड वाहतुक कोंडी आणि तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांननी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले आणि महामार्ग मोकळा केला. यानंतर, पीडितेचा मृत्यू देह असलेली रुग्णवाहिका वैकुंठ स्मशानभूमीकडे रवाना झाली. या संपूर्ण प्रकरणावर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. तसेच, आंदोलकांना हटवताना कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज करण्यात आला नाही," असे अमितेश कुमार यामनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले अमितेश कुमार? -
अमितेश कुणार म्हणाले, "घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, ही सर्वांचीच भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांचीही हीच भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका आम्ही पीडित मुलीच्या आई-वडिलांना सांगितली. ते मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. मात्र काही लोक त्यांची दिशाभुल करत होते. ते त्यांना चर्चेला येऊ देत नव्हते. चार साडेचार तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे हजारो लोकांना वेठीस धरले गेले होते. ज्यांना केवळ गोंधळ घालायचा होता, त्यांना पोलिसांनी बाजूला केले. कोणत्याही प्रकारचा लाठी चार्ज केला नाही. आम्ही उद्या पिडीतेच्या आई वडीलांशी त्यांच्या घरी जाऊन चर्चा करण्यात येणार आहे."
आरोपी कांबळेला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी -
दरम्यान या प्रकरणात राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. भिमराव कांबळे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला शनिवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षाने तपासासाठी अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने कांबळेला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्वाचे म्हणजे, तपासादरम्यान आरोपी काबळे विरोधात यापूर्वीही महिलांच्या लैंगिक छळाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिली.