नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 22:57 IST2026-05-02T22:54:26+5:302026-05-02T22:57:53+5:30
दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार नवले पुलावरील आंदोलन स्थळी पोहचले आणि त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी, "राज्य सरकारने तुमच्या आंदोलन खूप गांभीर्याने घेतले आहे. तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार आहे," असे आश्वासन आंदोलकांना दिले.

नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर आज संतप्त ग्रामस्थांनी नवले पुलाजवळ तीव्र आंदोलन केले. आरोपीला फाशी द्या, बाळाला न्याय मिळाल्याशिवाय रस्ता मोकळा होणार नाही, अशा घोषणा आंदोलक देत होते. दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार नवले पुलावरील आंदोलन स्थळी पोहचले आणि त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी, "राज्य सरकारने तुमच्या आंदोलन खूप गांभीर्याने घेतले आहे. तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार आहे," असे आश्वासन आंदोलकांना दिले.
दरम्यान, आपण आरोपीला फाशी द्या. आम्ही आंदोलन थांबवतो, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यानंतर, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न. यावेळी. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि नगरसेवक पुनीत जोशीही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी पुनीत जोशी यांनी प्रशासनाचे पत्र आंदोलकांना वाचूनही दाखवले. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिडीतेच्या नातेवाईकांशीही संवाद साधल्याचे समजते.
शनिवारी सकाळी नसरापूर परिसरात बंद -
या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हाच हादरला आहे. नागरिकांनी शुक्रवारी रात्री उशिरापासूनत पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शनिवारी सकाळी नसरापूर परिसरात बंद पाळण्यात आला तसेच ग्रामस्थांनी मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
बालिकेचा मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका नवले पुलाजवळ पोहोचताच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने महामार्गावर उतरले होते. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील स्वरणा हॉटेलसमोरील रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला होता. आंदोलकांनी आरोपीला फाशी द्या, बाळाला न्याय मिळाल्याशिवाय रस्ता मोकळा होणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी यावे, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली होती. दरम्यान, रास्ता रोकोमुळे मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.