Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:31 IST2026-05-02T19:30:40+5:302026-05-02T19:31:56+5:30

Pune crime : १९९८ मध्ये भोर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि घरात घुसखोरीसंदर्भातही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Pune crime : The '65-year-old' accused had already been driven out of the village; how is he still free? | Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ

Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ

 पुणे : नसरापूर (ता. भोर) येथील अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा साळवडे गावचा रहिवासी असलेल्या कांबळेला त्याच्या संशयास्पद वर्तन आणि गुन्हेगारी इतिहासामुळे गावातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

कांबळे हा नसरापूर परिसरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. बांधकामे, शेतीकामे तसेच इतर किरकोळ कामांसाठी तो परिसरात फिरत असे. त्यामुळे स्थानिक भागात त्याची ओळख होती. शुक्रवारी दुपारनंतर तो नसरापूर येथील राममंदिर परिसरात सुरू असलेल्या कळसाच्या कामाजवळ दिसल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी सध्या केळवडे रस्त्यालगत असलेल्या बुवासाहेब मंदिर परिसरात राहत होता. याआधीही त्याचा परिसरात मुक्त वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिस तपासात आरोपीविरोधातील जुने गुन्हेही समोर आले आहेत. राजगड पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच १९९८ मध्ये भोर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि घरात घुसखोरीसंदर्भातही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांतून तो जामिनावर बाहेर असल्याचे समजते.

तपास अधिक गतीने सुरू असून आरोपीला अटक केल्यानंतर शनिवारी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने आरोपीला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीविरोधात महिलांच्या लैंगिक छळासंबंधी आणखी काही तक्रारींची पडताळणी सुरू असून एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Web Title : पुणे अपराध: नसरापुर आरोपी, गांव से निष्कासित, पहले भी थे अपराध

Web Summary : नसरापुर हत्या मामले में गिरफ्तार भीमराव कांबले को संदिग्ध व्यवहार के कारण पहले गांव से निकाल दिया गया था। उसका आपराधिक इतिहास रहा है, जिसमें 2015 का पोक्सो मामला और 1998 में छेड़छाड़ का आरोप शामिल है। वह 7 मई तक पुलिस हिरासत में है।

Web Title : Pune Crime: Nasrapur Accused, Ousted from Village, Had Prior Offenses

Web Summary : Bhimrao Kamble, arrested in the Nasrapur murder case, was previously expelled from his village due to suspicious behavior. He has a history of crimes, including a 2015 POCSO case and a 1998 molestation charge. He's now in police custody until May 7th.