गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास

वय कमी असल्यामुळे क्रिकेट अकादमीत प्रवेश नाकारला, पण...

By सुशांत जाधव | Updated: May 2, 2026 19:43 IST2026-05-02T19:41:42+5:302026-05-02T19:43:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC Women's T20 World Cup 2026 Who Is Nandini Sharma WPL Hat-Trick Girl Maiden India Call Up For India Women's T20 Team Squad | गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास

गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास

इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे वर्ल्ड कप जिंकल्यावर छोट्या फॉरमॅटमध्ये पहिला वहिला विश्वचषक जिंकण्यासाठी निवडलेल्या १५ रणरागणींमधील नंदिनी शर्मा हिने सर्वांचे लक्षवेधले आहे. कारण पहिल्यांदाच तिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. एका बाजूला अमनजोत कौर आणि टीम इंडियातील ब्युटी हरलीन देओल यांना टी-२० संघात स्थान मिळाले नसताना ही नंदिनी शर्मा कोण? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!


गल्ली क्रिकेट ते टी-२० वर्ल्ड कप व्हाया WPL; कोण आहे नंदिनी शर्मा 

नंदिनी शर्मा ही उजव्या हाताची मध्यम जलदगती गोलंदाज आहे. महिला प्रीमियर लीगच्या गत हंगामात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाकडून खेळताना तिने हॅटट्रिकसह मैफील लुटली होती. एवढेच नाही तर तिने पर्पल कॅपही जिंकली होती. या स्वप्नवत कामगिरीनंतर आता टी-२० वर्ल्ड कपसाठी तिने भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे. 

WPL 2026 : कोण आहे नवी ‘हॅटट्रिक क्वीन’? रातोरात स्टार झालेल्या छोरीचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास

वय कमी असल्यामुळे अकादमीत प्रवेश नाकारला, पण...

नंदिनी मुळची चंडीगडची आहे. २० सप्टंबर २००१ रोजी जन्मलेल्या नंदिनीचा क्रिकेटचा प्रवास हा गल्ली क्रिकेटमधून सुरु झाला. भावाला पाहून ती क्रिकेटच्या प्रेमात पडली. वयाच्या ८ व्या वर्षी ती व्यावसायिक क्रिकेटचे धडे घेण्यासाठी अकादमीत प्रवेश घेण्यासाठी गेली. पण वय कमी असल्यामुळे तिला प्राथमिकता मिळाली नाही. पण तिने हार न मानता जिद्दीनं क्रिकेटच्या मैदानात आपली प्रतिभा दाखवून दिली. बॅक-ऑफ-द-हँड स्लोअर बॉल ही तिच्या गोलंदाजीतील खासियत आहे. 

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतही भारतीय संघात दिसली 

मध्यमगती गोलंदाज म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नंदिनी शर्माने महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून १० सामने खेळताना १७ विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच तिला हरमनप्रित कौरच्या संघात मोठी संधी मिळाली आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये बँकॉक येथे झालेल्या महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत ती भारतीय संघाचा भाग होती.
 

Web Title : गली क्रिकेट से टीम इंडिया: नंदिनी शर्मा का टी20 विश्व कप सपना।

Web Summary : नंदिनी शर्मा, एक मध्यम-तेज गेंदबाज, दिल्ली कैपिटल्स के साथ शानदार डब्ल्यूपीएल सीज़न के बाद भारत की टी20 विश्व कप टीम में जगह बनाई, जिसमें हैट्रिक और पर्पल कैप शामिल हैं। शुरुआती अकादमी अस्वीकृति को पार करते हुए, उन्होंने अपनी अनूठी बैक-ऑफ-द-हैंड धीमी गेंद से अपने कौशल को निखारा।

Web Title : Street cricket to Team India: Nandini Sharma's T20 World Cup dream.

Web Summary : Nandini Sharma, a medium-fast bowler, earned a spot in India's T20 World Cup squad after a stellar WPL season with Delhi Capitals, including a hat-trick and Purple Cap. Overcoming early academy rejection, she honed her skills with her unique back-of-the-hand slower ball.