MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला

रोहितचा सल्ला फायद्याचा ठरला, पण...

By सुशांत जाधव | Updated: May 2, 2026 22:58 IST2026-05-02T22:51:48+5:302026-05-02T22:58:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK vs MI Rohit Sharma Still Guiding Mumbai Indians Bowlers From The Dugout Krish Bhagat Follow Advice Former Captain Pics Goes Viral | MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला

MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला

चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानातील चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या 'करो वा मरो'च्या लढतीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नमन धीरच्या अर्धशतकाशिवाय अन्य कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी मुंबई इंडियन्सच्या संघाला १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली. अल्प धावसंख्येचा बचाव करताना MI ची गोलंदाजी पाहून डगआउटमध्ये बसलेला रोहित शर्मा चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

...अन् डगआउटमधून रोहित शर्माची 'कॅप्टन्सी' झलक

धावांचा बचाव करताना जसप्रीत बुमराहनं चेन्नई सुपर किंग्सच्या दुसऱ्या आणि आपल्या पहिल्या षटकात संजू सॅमसनची विकेट घेत MI ला चांगली सुरुवात करून दिली. ही विकेट पडल्यावर पॉवर प्लेमधील पाचव्या षटकात हार्दिक पांड्याने अश्विन कुमारच्या जागी संघात स्थान दिलेल्या क्रिश भगत याच्या हाती चेंडू सोपवला. उर्विल पटेल याने त्याचे षटकाराने स्वागत केले. दुसऱ्या चेंडूवर त्याला चौकार बसला. त्याचे हे षटक पाहून डगआउटमध्ये रोहित शर्मा चांगलाच भडकला. एवढेच नव्हे तर डगआउटमधूनच त्याने 'कॅप्टन्सी'ची झलक दाखवून देत युवा गोलंदाजाला गती परिवर्तन करून हळूवार चेंडू टाकण्याचा सल्ला दिला.

अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी

रोहितचा सल्ला फायद्याचा ठरला, पण...

युवा गोलंदाजानेही माजी कर्णधाराने दिलेला सल्ला लगेच अंमलात आणला. पुढच्या तीन चेंडूवर स्लोवर चेंडू टाकत त्याने कमबॅक केले. पण अखेरच्या चेंडूवर सगळं विसरुन त्याने पुन्हा गती पकडली अन्  षटकार खल्ला.  दुखापतीमुळे रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला तरी संघाच्या विजयासाठी त्याची तळमळ पुन्हा एकदा दिसून आली. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर तो चांगलाच हताश झाला होता. आता चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्मा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर डगआउटमधून हातवारे करतानाचे त्याचे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
 

Web Title : MI के युवा गेंदबाज पर रोहित शर्मा भड़के; CSK के खिलाफ डगआउट से मार्गदर्शन।

Web Summary : रोहित शर्मा, खेल नहीं रहे थे, फिर भी CSK मैच के दौरान MI के गेंदबाजों का डगआउट से मार्गदर्शन करते दिखे, युवा गेंदबाज द्वारा रन देने के बाद। उन्होंने गति बदलने की सलाह दी, चोट के बावजूद अपनी प्रतिबद्धता दिखाई। उनके हावभाव वायरल हो गए।

Web Title : Rohit Sharma irked at MI bowler; guided from dugout vs CSK.

Web Summary : Rohit Sharma, though not playing, was seen guiding MI bowlers from the dugout during the CSK match after a young bowler conceded runs. He advised varying pace, showing his continued commitment despite injury. His gestures went viral.