नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 23:50 IST2026-05-02T23:48:48+5:302026-05-02T23:50:22+5:30
अखेर पोलिसांना १०.१५ वाजण्याच्या सुमारास बळाचा वापर करावा लागला. त्यांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवून रस्ता मोकळा केला आणि मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. यानंतर, पीडितेचा मृत्यू देह असलेली रुग्णवाहिका वैकुंठ स्मशानभूमीकडे रवाना झाली.

नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर आज संतप्त ग्रामस्थांनी नवले पुलाजवळ तीव्र आंदोलन केले. आरोपीला फाशी द्या, बाळाला न्याय मिळाल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. यामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सिंहगड रस्त्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणारा मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केला होता. परिणामी परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले आणि रस्ता मोकळा झाला. यानंतर, आता पीडितेचा मृत्यू देह असलेली रुग्णवाहिका वैकुंठ स्मशानभूमीत दाखल झाली आहे.
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल#Punecrime#Nasrapur_child_assault_and_murder#PuneNavaleBridgeprotestpic.twitter.com/bxEOBSGOys
— Lokmat (@lokmat) May 2, 2026
"तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार" -
दरम्यान, काही वेळापूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमारही नवले पुलावरील आंदोलन स्थळी पोहचले होते. त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी "राज्य सरकारने तुमच्या आंदोलन खूप गांभीर्याने घेतले आहे. तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार आहे," असे आश्वासनही त्यांनी आंदोलकांना दिले. मात्र, आरोपीला फाशी द्या. आम्ही आंदोलन थांबवतो, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
हेही वाचा - नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
यानंतर, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न. यावेळी. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि नगरसेवक पुनीत जोशीही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी पुनीत जोशी यांनी प्रशासनाचे पत्र आंदोलकांना वाचूनही दाखवले. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
हेही वाचा - नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद
...आणि पीडितेचा मृत्यू देह असलेली रुग्णवाहिका वैकुंठ स्मशानभूमीकडे रवाना झाली -
अखेर पोलिसांना १०.१५ वाजण्याच्या सुमारास बळाचा वापर करावा लागला. त्यांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवून रस्ता मोकळा केला आणि मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. यानंतर, पीडितेचा मृत्यू देह असलेली रुग्णवाहिका वैकुंठ स्मशानभूमीकडे रवाना झाली.
हेही वाचा - नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प