नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील

कोण आहे रामकृष्ण घोष? देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशी राहिलीये त्याची कामगिरी?

By सुशांत जाधव | Updated: May 2, 2026 22:12 IST2026-05-02T22:00:45+5:302026-05-02T22:12:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Who is Ramakrishna Ghosh CSK's New Weapon Who Dismissed Suryakumar Yadav On His IPL Debut After Spectacular Catch To Dismiss MI Opener Will Jacks Watch Video | नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील

नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील

Who is Ramakrishna Ghosh CSK's New Weapon Who Dismissed Suryakumar Yadav On His IPL Debut : आयपीएल २०२६ च्या चेपॉकच्या मैदानातील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने गत हंगामापासून संघात असलेल्या नाशिकच्या रामकृष्ण घोष याला अखेर पदार्पणाची संधी दिली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजीला येण्याआधी रामकृष्ण घोष याने मुंबई इंडियन्सला सलामीवीर विल जॅक्सच्या रुपात मोठा धक्का देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत सुपरमॅन होऊन त्याने स्फोटक बॅटर विल जॅक्सचा अवघ्या १ धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. एवढेच नाही तर पदार्पणाच्या सामन्यात त्याने सूर्यकुमार यादवच्या रुपात आपली पहिली विकेटही घेतली. 

कोण आहे रामकृष्ण घोष?

चेपॉकच्या मैदानात IPL च्या पहिल्या सामन्यात हवा करणारा २८ वर्षी रामकृष्ण घोष उजव्या हाताचा मध्यम जलदगती गोलंदाज आहे. फलंदाजीतही तो उपयुक्त कामगिरी करू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या घोष याचा जन्म नाशिकचा. जवळपास दोन हंगामांपासून तो चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याला अखेर पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात त्याने फिल्डिंगसह सूर्यकुमार यादवची विकेट घेत दमदार पदार्पण करत मैफील लुटली. 

 अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशी राहिलीये त्याची कामगिरी?

रामकृष्ण घोष याने  २०२२ मध्ये टी-२० आणि २०२३ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून गेल्या काही वर्षांत त्याने सातत्यपूर्ण कामगिरीसह आपल्यातील धमक दाखवली आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ११ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये त्याची कामगिरी तुलनेने कमी प्रभावी राहिली आहे. ९ सामन्यांत त्याच्या खात्यात फक्त २ विकेट्स जमा आहेत. गोलंदाजीशिवाय फलंदाजीत त्याने आपली क्षमता दाखवताना लिस्ट A मध्ये ११ सामन्यांत २४६ धावा केल्या आहे. २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील हंगामात पंजाबविरुद्ध ७३ धावांची दमदार खेळीसह लक्षवेधले होते. पंजाबविरुद्धच्या सामन्यातच त्याने ९.२ षटकांत ४२ धावा देत ७ बळी घेतले होते. लिस्ट ए क्रिकेटमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

Web Title : नाशिक के रामकृष्ण घोष का कमाल: सुपरमैन कैच, IPL डेब्यू पर विकेट!

Web Summary : नाशिक के रामकृष्ण घोष ने CSK के लिए डेब्यू किया और तुरंत प्रभाव डाला। उन्होंने शानदार कैच लिया और सूर्यकुमार यादव का विकेट लिया। 28 वर्षीय मध्यम-तेज गेंदबाज का घरेलू रिकॉर्ड मजबूत है, जो महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करते हैं और अपनी हरफनमौला क्षमता साबित करते हैं।

Web Title : Nashik's Ramakrishna Ghosh Shines: Superman Catch, Wicket on IPL Debut!

Web Summary : Ramakrishna Ghosh, from Nashik, debuted for CSK, making an instant impact. He took a stunning catch and claimed Suryakumar Yadav's wicket. The 28-year-old medium-fast bowler has a strong domestic record, representing Maharashtra and proving his all-round abilities.