आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 20:15 IST2026-05-02T20:14:47+5:302026-05-02T20:15:38+5:30

शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मीरानपूर मोहल्ल्यातील एका घरातून ही घटना समोर आली...

Ambedkarnagar shaken Husband marries Pakistani woman wife takes out all her anger on children 4 children crushed to death in UP | आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!

आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!

उत्तर प्रदेशातील अंबेडकरनगर जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक अन् अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. एका मातेने आपल्याच चार चिमुकल्यांना विटेने ठेचून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी महिला फरार झाली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मीरानपूर मोहल्ल्यातील एका घरातून ही घटना समोर आली.

पतीच्या दुसऱ्या निकाहचा राग मुलांवर काढला - 
प्राथमिक पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती नियाज, हा गेल्या काही वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये नोकरी करतो. त्याने तेथेच एका पाकिस्तानी महिलेशी दुसरा निकाह (लग्न) केला. यासंदर्भात माहिती मिळताच, संबंधित महिलेला मोठा धक्का बसला आणि मानसिक तणावात गेली. याच वैफल्यातून तिने आपल्या पोटच्या चार मुलांची ठेचून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चिमुकल्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात -
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराचा दरवाजा आतून बंद होता, तो उघडल्यानंतर, बेडवर चारही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. शफीक, सउद, उमर आणि मुलगी बयान, अशी या चार चिमुकल्यांची नावे आहेत. यासंदर्भात, पोलीस अधीक्षक प्राची सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत मुलांचे वय १४, १२, १० आणि ८ वर्षे होते. 

घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. ३५ वर्षीय आरोपी महिलेच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके तयार केली असून, तिचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title : अंबेडकरनगर: पति के पाकिस्तानी महिला से निकाह के बाद पत्नी ने चार बच्चों की हत्या की

Web Summary : अंबेडकरनगर में, एक महिला ने सऊदी अरब में अपने पति के पाकिस्तानी महिला से शादी करने की खबर मिलने के बाद अपने चार बच्चों की हत्या कर दी। 8 से 14 वर्ष की आयु के बच्चे अपने घर में मृत पाए गए। मां फरार है, पुलिस उसकी तलाश कर रही है।

Web Title : Ambedkarnagar Shaken: Wife Murders Four Children After Husband's Pakistani Marriage

Web Summary : In Ambedkarnagar, a woman killed her four children after learning her husband married a Pakistani woman in Saudi Arabia. The children, aged 8 to 14, were found dead in their home. The mother is currently absconding, and police are searching for her.