CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"

CSK विरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला हार्दिक पांड्या?

By सुशांत जाधव | Updated: May 3, 2026 01:43 IST2026-05-03T01:36:32+5:302026-05-03T01:43:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Hardik Pandya Says Mumbai Indians' Loss To Chennai Super Kings Reflected A Poor Season Not Just A Bad Game | CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"

CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"

IPL 2026, MI Captian Hardik Pandya Statement After Lose Against CSK :  चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या पदरी यंदाच्या हंगामातील सातव्या पराभवाची नामुष्की ओढावली. या पराभवासह MI ची स्वबळावर प्लेऑफ्सच तिकीट मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी तिन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्याच सांगत हार्दिक पांड्यानं  "हा हंगामच आमचा नाही" असे म्हणून मोकळा झाला.
 
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पांड्यानं पॅकअप झाल्याचं केलं मान्य

मुंबई इंडियन्सच्या संघाने १३ वर्षांनी यंदाच्या हंगामात विजयासह मोहिमेची सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर ९ सामन्यात फक्त त्यांनी फक्त २ सामने जिंकले.  त्यामुळे MI जवळपास प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. हार्दिक पांड्याने पॅकअप झाल्याचे मान्य करत आघाडीच्या चारमध्ये पोहचणे मुश्किल असल्याचे मान्य केले. 

IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?

CSK विरुद्धच्या पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पांड्या?

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, "मला वाटत नाही की, हा आमचा हंगाम आहे. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वत क्षेत्रात ते आमच्यापेक्षा सरस ठरले. एक वेळ अशी होती की, आम्ही १८० ते  १९० धावांपर्यंत पोहचू, असे वाटत होते. पण १० षटकांनंतर आम्ही लय टिकवू शकलो नाही. आम्ही सामना योग्य प्रकारे संपवू शकलो नाही."

ते सर्वच क्षेत्रात आमच्यापेक्षा भारी ठरले

तो पुढे म्हणाला की, " डावाच्या सुरुवातीला मोठे फटके खेळणे सोपे नव्हते. त्यांनी विचारपूर्वक खेळी केली. जिथ धावगती वाढवायची होती तिथं आमचे फलंदाज कमी पडले. कारण चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांना बाद करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम गोलंदाजी करायची होती. आम्ही सर्व पर्याय वापरले, पण ते आमच्यापेक्षा सरस ठरले."

चेन्नई सुपर किंग्सनं एकतर्फी जिंकली मॅच

या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. सुरुवातीच्या १० षटकांत MI नं त्यांनी दमदार सुरुवात करत ९० पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र त्यानंतर डाव कोलमडला. निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ते फक्त १५९ धावांपर्यंचत मजल मारू शकले. धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सनं कर्णधार ऋतुराज गायकवाडसह कार्तिक शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १८.१ षटकांत ८ विकेट्स राखून सामना जिंकला. 

Web Title : CSK से हार के बाद हार्दिक पांड्या: MI का सीज़न ख़त्म।

Web Summary : CSK से हार के बाद, MI के कप्तान हार्दिक पांड्या ने माना कि उनका सीज़न प्रभावी रूप से खत्म हो गया है। उन्होंने स्वीकार किया कि CSK ने उन्हें बल्लेबाजी, गेंदबाजी और क्षेत्ररक्षण सहित सभी पहलुओं में पछाड़ दिया। पांड्या ने माना कि अब मुंबई इंडियंस के लिए प्लेऑफ में पहुंचना बेहद मुश्किल है।

Web Title : Hardik Pandya: MI's season is over after loss to CSK.

Web Summary : After losing to CSK, MI captain Hardik Pandya admitted their season is effectively over. He acknowledged CSK outplayed them in all aspects, batting, bowling, and fielding. Pandya conceded reaching the playoffs is now extremely difficult for Mumbai Indians.