नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 03:21 IST2026-05-03T03:19:38+5:302026-05-03T03:21:29+5:30

National Commission for Women On Nasrapur case : "हा जघन्य अपराध तीव्र वेदना आणि संताप निर्माण करणारा असून, मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर चिंता व्यक्त होत आहे. तसेच असे गुन्हे मुलांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे आणि समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात," असे आयोगाने म्हटले आहे.

Nasrapur case National Commission for Women takes note, expresses strong anger; direct focus on investigation | नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष

नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष

भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण पूणे हादरले आहे. या पाशवी घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. "हा जघन्य अपराध तीव्र वेदना आणि संताप निर्माण करणारा असून, मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर चिंता व्यक्त होत आहे. तसेच असे गुन्हे मुलांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे आणि समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात," असे आयोगाने म्हटले आहे.

"असे गुन्हे समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात" -
राष्ट्रीय महिला आयोगाने 'एक्स'वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील पुणे येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या या अत्यंत भीषण घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. हा जघन्य अपराध तीव्र वेदना आणि संताप निर्माण करणारा असून, मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर चिंता व्यक्त होत आहे. या अमानवीय कृत्याचा तीव्र निषेध करतो. असे गुन्हे मुलांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे आणि समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात." 

हेही वाचा - नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार

माननीय अध्यक्षांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला या प्रकरणाची तात्काळ दखल घेत, तपासावर लक्ष ठेवण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली आहे. 

जलदगती न्यायालयांत वेगाने खटला चालविण्यावर आयोगाचा भार - 
याच बरोबर, पीडितेच्या कुटुंबाला त्वरित मदत आणि नुकसान भरपाई देणे, पॉक्सो कायद्यांतर्गत कालबद्ध आरोपपत्र दाखल करणे आणि जलदगती न्यायालयांत वेगाने खटला चालवण्यासंदर्भातही आयोगाने भर दिला आहे. तसेच प्रत्येक मुलीची सुरक्षा आणि न्याय सुनिश्चित करणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?



६५ वर्षीय आरोपीला अटक, ७ मेपर्यंत पोलीस कोठडी -
दरम्यान, या प्रकरणात राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. भिमराव कांबळे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला शनिवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षाने तपासासाठी अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने कांबळेला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

महत्वाचे म्हणजे, तपासादरम्यान आरोपी काबळे विरोधात यापूर्वीही महिलांच्या लैंगिक छळाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिली. 
 

Web Title : नसरापुर मामला: राष्ट्रीय महिला आयोग ने लिया संज्ञान, व्यक्त किया आक्रोश, जांच पर नजर।

Web Summary : राष्ट्रीय महिला आयोग ने नसरापुर बलात्कार और हत्या मामले का संज्ञान लिया, महिलाओं की सुरक्षा पर चिंता व्यक्त की। आयोग ने सख्त कार्रवाई, फास्ट-ट्रैक परीक्षण और पीड़िता के परिवार के लिए मुआवजे की मांग की। यौन उत्पीड़न के इतिहास के साथ 65 वर्षीय संदिग्ध गिरफ्तार।

Web Title : Nasrapur Case: National Women's Commission intervenes, expresses outrage, monitors investigation.

Web Summary : National Women's Commission takes cognizance of Nasrapur rape and murder case, expressing concern over women's safety. They demand strict action, fast-track trial, and compensation for the victim's family. A 65-year-old suspect is arrested with a history of sexual assault.