भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 05:50 IST2026-05-03T05:50:31+5:302026-05-03T05:50:55+5:30
याशिवाय परिसराची शक्ती प्राप्त करण्याकरिता २१ देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करील त्यात तुझा मृत्यू होईल, अशी भीती घालून २१ देशांमध्ये मौजमजा करून आला. एवढेच नव्हे तर मृत्यूची भीती दाखवून जासूदची कार स्वतःच्या नावावर करून घेतली.

भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
नाशिक : भोंदू अशोक खरात यास शुक्रवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. बडवे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. भोंदू खरातने फिर्यादी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यास अवतार पूजा करायची आहे, असे सांगून चार ते पाच कोटी रुपये या गुन्ह्यात उकळले. याशिवाय परिसराची शक्ती प्राप्त करण्याकरिता २१ देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करील त्यात तुझा मृत्यू होईल, अशी भीती घालून २१ देशांमध्ये मौजमजा करून आला. एवढेच नव्हे तर मृत्यूची भीती दाखवून जासूदची कार स्वतःच्या नावावर करून घेतली.
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
रिंगण फिर्यादीभोवती आखून मृत्यूची भीती
भोंदू अशोक खरातने फिर्यादी असलेल्या जासूद यास नवीन वास्तूमध्ये उत्तरपूजा करण्याचे कारण सांगून मिरगाव येथील महादेवाच्या मंदिरात बोलाविले.
तिथे खरातने फिर्यादीभोवती रिंगण आखून तुला कैद केले आहे, काळी जादू करून तुझा मृत्यू घडवून येईल, अशी भीती दाखवून त्याच ठिकाणी लाखो रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
बांधकाम खर्चाची वसुली
खरातने उत्तरपूजेच्या नावाखाली जासूद यांना मृत्यूची भीती दाखवून सिन्नर तालुक्यातील फार्म हाउसमध्ये बांधकामाचा खर्च वसूल केला.