बैठक असो वा सोहळा, यांचा पोशाख आगळा-वेगळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:45 PM2019-06-24T14:45:17+5:302019-06-24T14:51:31+5:30

मार्क झकरबर्ग- फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग कायम जिन्स आणि टी-शर्टमध्ये दिसतो. बऱ्याच कार्यक्रमांना तो याच वेशात दिसतो.

स्टिव्ह जॉब्स- अ‍ॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्सदेखील नेहमी जिन्स आणि ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसायचे. कोणत्याही कार्यक्रमात त्यांची हीच वेशभूषा असायची.

एलेन डीजेनेरेस- कॉमेडियन असलेल्या एलेन डीजेनेरेस यांची वेशभूषा दररोज जवळपास सारखीच असते. स्लिम पँट किंवा जीन्स, पॅटर्नर्ड शर्ट्स आणि जॅकेटमध्ये दिसतात.

कार्ल लगेरफेल्ड- जर्मन दिग्दर्शक आणि फॅशन डिझायनर यांचं नाव फॅशनच्या जगतात आदरानं घेतलं जातं. मात्र ते स्वत: कोणताही ट्रेंड फॉलो करत नाहीत. ते कायम काळा सूट, पांढरा शर्ट, काळा टाय, काळ्या जॅकेटमध्ये दिसतात.

एडेल- गायिका एडेल कायम गडद रंगाच्या गाऊनमध्ये दिसतात.

हिलरी क्लिंटन- अमेरिकेतील एक प्रमुख राजकीय व्यक्तीमत्त्व असलेल्या हिलरी क्लिंटन बहुतांशवेळा पँटसूटमध्ये दिसतात.