विदर्भातील जास्तीत जास्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्र्याचा दर्जा, गुणवत्ता, पॅकेजिंगसह उत्पादनाची तांत्रिक पद्धतीची माहिती आणि विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...
शहरातील सर्व भागातील कचरा उचलला जावा, यासाठी ४७२ वाहने लावली जाणार आहे. या वाहनांचे ‘रोड मॅप’ निश्चित करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी बैठकीत दिले. ...
मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या संचालकांनी अल्पावधीतच मालामाल बनविण्याचे स्वप्न दाखवून अनेकांना कंगाल केले. कोट्यवधी रुपये हडपून कंपनीचे संचालक पळून गेल्याने संबंधितांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ पर्यंत नागपूर शहरातील १० हजार झोपडपट्टीवासी कुटुंबांना मालकी पट्टे वाटप करण्याचे निर्धारित केले होते. परंतु ऑक्टोबर संपला तरी जेमतेम तीन हजार झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्यात आले. ...
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीचे औचित्य साधून भल्या सकाळी गुलाबी थंडीत झालेल्या या रॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी सहभाग नोंदविला. न्यायमूर्ती, पोलीस आयुक्तांसह तरुणाईही धावली. ...
स्वत:च्या नातेवाईकासह एका टाईल्स व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करणारा गँगस्टर संतोष आंबेकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध लकडगंज ठाण्यात पुन्हा दोन गुन्हे दाखल झाले आहेत. ...
राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी निवडणुका या हिवाळी अधिवेशानानंतर होतील, अशी शक्यता आहे. ...
छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना मतदारांनी नाकारले आहे. जिल्ह्यातील १२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १४६ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत. ...