कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:08 IST2026-04-18T19:08:14+5:302026-04-18T19:08:53+5:30

Bird flu in Karnataka 2026: बेंगळुरूच्या हेसरघट्टा येथील सरकारी पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 बर्ड फ्लू विषाणू आढळला आहे.

Bird flu in Karnataka 2026: 'Bird flu' enters Karnataka! H5N1 virus outbreak in poultry farm in Bengaluru; Thousands of chickens buried | कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले

कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले

बेंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूच्या उत्तर भागात असलेल्या हेसरघट्टा येथील सरकारी 'पोल्ट्री ट्रेनिंग सेंटर'मध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने १४ एप्रिल रोजी पाठवलेल्या अहवालात 'H5N1' या घातक विषाणूची पुष्टी केली आहे. यानंतर आरोग्य विभागाने परिसरात हाय अलर्ट घोषित केला असून तातडीने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

संसर्ग रोखण्यासाठी १५ एप्रिल रोजी ७,४४४ पक्षांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. तसेच १४,७८८ अंडी आणि २,२५० किलो पोल्ट्री खाद्य नष्ट करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पक्षांना पुरण्यात आले आहे, तो परिसर पुढील एक वर्षासाठी 'प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. पक्षांची विल्हेवाट लावणाऱ्या १० कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांना ओसेल्टामिविर हे औषध देण्यात आले आहे.

केंद्रापासून ३ किमीचा परिसर 'इन्फेक्टेड झोन' आणि १० किमीचा परिसर 'सर्वेक्षण झोन' म्हणून जाहीर केला आहे. आशा कार्यकर्त्या घरोघरी जाऊन ताप असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करत आहेत.

आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी नागरिकांना घाबरू नका असे आवाहन केले आहे. "आतापर्यंत कोणत्याही मानवामध्ये या संसर्गाची लक्षणे आढळलेली नाहीत. परिस्थिती नियंत्रणात असून पुरेशा प्रमाणात पीपीई किट्स आणि औषधांचा साठा उपलब्ध आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : कर्नाटक में बर्ड फ्लू का प्रकोप; हजारों कुक्कुट पक्षी मारे गए

Web Summary : बेंगलुरु के पोल्ट्री फार्म में H5N1 बर्ड फ्लू की पुष्टि। हजारों पक्षियों को मारा गया, अंडे नष्ट किए गए। क्षेत्र प्रतिबंधित घोषित। स्वास्थ्य अधिकारी मानव संक्रमण की निगरानी कर रहे हैं; मंत्री का कहना है कि स्थिति नियंत्रण में है।

Web Title : Bird Flu Outbreak in Karnataka; Thousands of Poultry Birds Culled

Web Summary : H5N1 bird flu confirmed at Bengaluru poultry farm. Thousands of birds culled, eggs destroyed. Area declared restricted. Health officials monitor for human infection; situation under control, says minister.