"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:45 IST2026-04-18T19:44:15+5:302026-04-18T19:45:03+5:30

Indian Tanker Jag Arnav Iran Navy: हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने भारतीय तेल टँकर 'जग अर्णव'वर गोळीबार केला. परवानगी असतानाही झालेल्या या हल्ल्यावर भारतीय कॅप्टनने इराणला दिलेल्या रोखठोक प्रत्युत्तराचा सविस्तर वृत्तांत वाचा.

Iran Navy Firing: "You gave permission and now you're firing?" Indian captain betrayed by Iranian Navy, thrill on radio | "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर

"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या 'जग अर्णव' या भारतीय तेल टँकरवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी केलेल्या गोळीबाराचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय जहाजाच्या कॅप्टनने रेडिओ संदेशाद्वारे इराणच्या नौदलाला खडेबोल सुनावले. या संवादाची ऑडिओ क्लिप आणि माहिती आता जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा इराणच्या गनबोट्सनी विना इशारा गोळीबार सुरू केला, तेव्हा भारतीय कॅप्टनने इराणी नेव्हीला सुनावले आहे. 

भारतीय कॅप्टन: "सेपाह नेव्ही (इराण नौदल), आम्ही तुमच्याकडूनच रीतसर 'क्लिअरन्स' (परवानगी) घेऊन या मार्गावरून जात आहोत. तुम्ही आम्हाला पुढे जाण्याची संमती दिली होती, मग आता आमच्यावर गोळीबार का करत आहात?" तुमच्या यादीत माझे जहाज दुसऱ्या क्रमांकावर आहे, असेही या कॅप्टनने सांगितले. परंतू, इराण गोळीबार करतच राहिला.

इराणचा गोळीबारच...
यावर इराणच्या बाजूने कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही, उलट गोळीबार सुरूच ठेवण्यात आला. यामुळे भारतीय टँकरला आपला मार्ग बदलावा लागला.

भारताचे कडक पाऊल
इराणने स्वतःच हा सागरी मार्ग खुला केल्याचे जाहीर केले होते आणि भारतीय जहाजाला अधिकृत परवानगीही दिली होती. असे असूनही झालेला हा हल्ला विश्वासघातासारखा असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूताला बोलावून या 'रेडिओ ट्रान्सक्रिप्ट'चा हवाला देत जाब विचारला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य
'जग अर्णव' हे जहाज २० लाख बॅरल तेल घेऊन जात होते. इराणच्या या कृतीमुळे जागतिक स्तरावर इराणच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या हे भारतीय जहाज ओमानच्या दिशेने सुरक्षितपणे परतले आहे, मात्र या घटनेमुळे आखाती देशांतील तणाव एका नव्या वळणावर पोहोचला आहे.

Web Title : ईरान की नौसेना ने भारतीय जहाज को धोखा दिया: "आप गोली क्यों चला रहे हैं?"

Web Summary : ईरानी बलों ने पूर्व अनुमति के बावजूद एक भारतीय तेल टैंकर पर गोलीबारी की। कप्तान ने रेडियो के माध्यम से उनका सामना किया। भारत ने ईरानी राजदूत को तलब कर हमले का विरोध जताया। जहाज सुरक्षित रूप से ओमान लौट गया, जिससे खाड़ी में तनाव बढ़ गया।

Web Title : Iran's Navy Betrays Indian Ship: "Why are you shooting?"

Web Summary : Iranian forces fired on an Indian oil tanker despite prior clearance. The captain confronted them via radio. India summoned the Iranian ambassador, protesting the attack. The ship safely returned to Oman, escalating Gulf tensions.