Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 10:51 IST2026-04-18T19:51:14+5:302026-04-19T10:51:47+5:30
Akshaya Tritiya Wishes in Marathi: अक्षय्य तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवलेला एक छोटासा शुभेच्छा संदेशही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी पुरेसा असतो. या मंगल दिनी सोन्याच्या खरेदीइतकेच नात्यांमधील प्रेमाचा गोडवा अक्षय्य ठेवणे आणि एकमेकांप्रति सदिच्छा व्यक्त करणे संस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जाते. म्हणूनच, तुमच्या आप्तस्वकीयांच्या आयुष्यात आनंदाची भर घालण्यासाठी आणि सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी खालीलपैकी तुमचे आवडते शुभेच्छा संदेश नक्की निवडा.

Akshaya Tritiya Wishes in Marathi
तुमच्या व्यवसायात वाढ होऊ देत, तुमच्या कुटुंबात सदैव प्रेम आणि आपुलिक राहो, धन संपत्तीचा वर्षाव होवो, मान सन्मानात कोणतीही कमी न होवो! अक्षय्य तृतीयेचा हार्दिक शुभेच्छा!

Akshaya Tritiya Status in Marathi
तुमच्या घरात धन-संपत्तीचा वर्षाव होवो, माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहो, प्रेम बंधुभाव वाढो, विश्वात एकात्मता कायम राहो! तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

Akshaya Tritiya Chya Hardik Shubhechha
अक्षय्य राहो सुख तुमचे… अक्षय्य राहो धन तुमचे… अक्षय्य राहो प्रेम तुमचे… अक्षय्य राहो आरोग्य तुमचे. अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

Akshay Tritiya Wishes in Marathi
धन लक्ष्मी येवो घरी, लक्ष्मीची कृपादृष्टी असो त्यावरी करुन सोन्याची खरेदी करु अक्षय्य तृतीया साजरी अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

Akshaya Tritiya Images in Marathi
आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना सदैव! अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..!

Akshay Tritiya Chya Shubhechha
माता लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणपती बाप्पाचा वास असो, आणि माता दुर्गाचा आशिर्वाद असो तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होवो, अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

सुवर्ण क्षणांच्या आठवणी, लक्ष्मी येवो अक्षय्य तृतीयेच्या दिनी, सौभाग्य जाईल उजळुनी, सुख, समृद्धी लाभो जीवनी! अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा...

अक्षय्य राहो धनसंपदा, अक्षय्य राहो शांती.. अक्षय्य राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती.. अक्षय्य तृतीयेच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

















