७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:00 IST2026-04-18T13:00:12+5:302026-04-18T13:00:41+5:30
TCS Nashik Case : टीसीएस प्रकरणात डिजिटल व तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरणार असून, अनेक पुराव्यांचे क्लोनिंग करण्यात आल्याने त्याच्यातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा करण्यात एसआयटीला यश आलं आहे.

७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
टीसीएस प्रकरणात डिजिटल व तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरणार असून, अनेक पुराव्यांचे क्लोनिंग करण्यात आल्याने त्याच्यातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा करण्यात एसआयटीला यश आलं आहे.
आठही आरोपींचे मोबाईल, त्यांचे लॅपटॉप पथकाने जप्त केले होते. ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चेनानी हिला आरोपींचे आलेले एकूण ७८ मेल, २२ फोन कॉल फॉरेन्सिक टीमने तपासले. फरार निदा खान हिने आरोपींना केलेले चॅटिंगही तपासण्यात आलं आहे. अटकेतील आरोपी व निदा खान यांच्यातील ऑफिस कामाव्यक्तिरिकत असलेले चॅटिंग संशयास्पद वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
"आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
पीडितांना फसवून धर्मांतराचा डाव रचण्यासाठी जो WhatsApp ग्रुप तयार करण्यात आला होता त्याच्यातील बारकावेदेखील डिजिटल तपासणीतून पाहण्यात आले. एका रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजही एसआयटी पथकाने ताब्यात घेतले. ९ गुन्हे दाखल झाल्यानंतर पीडितांचा जबाब घेण्यात आला. प्रत्यक्ष पुरावा हाती हवा यासाठी डिजिटल व तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी पथकाने परिश्रम घेतले.
"अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
निदा खानचे गर्भवती असल्याचं जामिनासाठी कारण
निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केले असून, ती गर्भवती असल्याचे कारण अर्जात नमूद करण्यात येणार आहे. जामिनासाठीची प्रक्रिया आम्ही सुरू केली असून, न्यायालयासमोर अर्ज सादर केला जाईल, असे निदा खानचे वकील बाबा सय्यद यांनी म्हटलं आहे. निदा खान फरार आहे. तिच्या शोधासाठी दोन ते तीन पथकं वेगवेगळ्या भागात रवाना केल्याचं यंत्रणेकडून सांगण्यात आलं. दिल्लीतील एचआर टीमने दोन दिवसात चौकशी पूर्ण केली. कंपनीला टीम अहवाल सादर करेल.