Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:58 IST2026-04-17T11:57:18+5:302026-04-17T11:58:43+5:30

Nida Khan : TCS च्या नाशिक युनिटमध्ये जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप असलेल्या निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. याच दरम्यान कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार निदा प्रेग्‍नेंट आहे.

nashik tcs conversion accused Nida Khan family claims she is pregnant wants court relief | Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा

Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा

TCS च्या नाशिक युनिटमध्ये जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप असलेल्या निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. याच दरम्यान कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार निदा प्रेग्‍नेंट आहे. यामुळेच सध्या फरार असलेल्या निदाने नाशिकच्या स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यामध्ये तिने आपल्या प्रकृतीचं कारण मुख्यत्वे नमूद केलं आहे. निदा ही 'एचआर' (HR) असल्याचं आधी सांगितलं जात होतं, परंतु प्रत्यक्षात ती 'प्रोसेसिंग असोसिएट' आहे. तिला या प्रकरणात विनाकारण अडकवण्यात येत असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

निदा खानचे वकील बाबा सिद्दकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "निदाचे आई-वडील प्रचंड धक्क्यात आहेत. त्यांच्या मते, त्यांच्या मुलीने काहीही केलेलं नाही आणि तिला मुद्दाम अडकवलं जात आहे. निदा २०२१ मध्ये टीसीएस बीपीओमध्ये रुजू झाली होती आणि ती एचआर नसून प्रोसेसिंग असोसिएट आहे." २५ वर्षीय निदाने २०२१ मध्ये नाशिक येथील टीसीएसच्या बीपीओ युनिटमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. 

HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?

आठ जणांना अटक

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आठ महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांवर लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या आठ कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या तक्रारींच्या तपासासाठी पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एसआयटीची स्थापना केली. वरिष्ठ सहकाऱ्यांनी आपला मानसिक आणि लैंगिक छळ केला आणि एचआर विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं असा दावा पीडित कर्मचाऱ्यांनी केला होता. पोलिसांनी या प्रकरणी कंपनीच्या महिला एचआर मॅनेजरसह एकूण आठ जणांना अटक केली आहे.

"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी

एचआरवर तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप एचआर मॅनेजरवर आहे. अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींची नावं दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सारी अशी आहेत. अटकेनंतर न्यायालयाने एचआर मॅनेजरला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यावर टीसीएसने रविवारी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचा छळ किंवा सक्ती विरोधात कंपनीचं 'झिरो टॉलरन्स' धोरण आहे. नाशिक कार्यालयातील लैंगिक छळ प्रकरणात सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनालाही कंपनीने दुजोरा दिला आहे.

Web Title : निदा खान के माता-पिता का दावा: बेटी गर्भवती, धर्मांतरण मामले में फंसाया जा रहा है।

Web Summary : टीसीएस नासिक में जबरन धर्म परिवर्तन के आरोप में निदा खान के परिवार का दावा है कि वह गर्भवती है। उनका आरोप है कि उसे गलत तरीके से फंसाया जा रहा है और उसने अपने स्वास्थ्य का हवाला देते हुए अग्रिम जमानत की मांग की है। यौन उत्पीड़न और जबरन धर्म परिवर्तन के आरोपों के मामले में आठ गिरफ्तार।

Web Title : Nida Khan's parents claim: Daughter pregnant, deliberately framed in conversion case.

Web Summary : Nida Khan, accused of forced conversion at TCS Nashik, is pregnant, her family claims. They allege she's wrongly implicated and has sought anticipatory bail, citing her health. Eight have been arrested in the case involving sexual harassment and forced conversion allegations.