TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:31 IST2026-04-17T11:28:06+5:302026-04-17T11:31:03+5:30

पीडितेचा विनयभंग करून तिचा मानसिक छळ करण्यात आला आहे. तसेच पीडितेच्या धार्मिक भावनादेखील आरोपींना दुखावल्या आहेत असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले.

HR Nida Khan, the mastermind in TCS case, fled Maharashtra?; Police search underway in 3 states | TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना

TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना

नाशिक - TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात मास्टर माइंड असलेली निदा खान महाराष्ट्राबाहेर पळाल्याचा संशय आहे. निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. परंतु एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. निदा खानच्या नाशिकमधील काही नातेवाईकांनी याबाबत २-३ वकिलांशी सल्लामसलत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निदा खानच्या तपासासाठी ३ पथके वेगवेगळ्या राज्यात रवाना झाले आहेत.

निदा खान भिवंडीत असल्याचे सांगण्यात येत होते, परंतु तपास पथकाला ती सापडली नाही. गुजरात, केरळ, काश्मीर या राज्यात तिच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. मुंबई येथे तिचे लोकेशन शोधण्यात आल्याचे समजते. निदा खान ही या प्रकरणातील मास्टर माइंड असून तिने कंपनीतील विशिष्ट धर्मांतील तरुणींना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तिच्या पुणे येथील घराचीही झडती घेण्यात आली परंतु ती आढळली नाही.

आरोपीला कैद्याकडून मारहाण

या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी शफी भिकन शेख याला न्यायालयीन कोठडीत कैद्याकडून मारहाण झाल्याची तक्रार अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडिया यांच्याकडे आली आहे. शेख याला गुरुवारी कोर्टात हजर केले असता न्यायाधीशांनी आपणास काही सांगायचे आहे का असे विचारले. त्यावर आरोपीने हा खुलासा केला. न्यायाधीशांनी केवळ ते ऐकून घेतले. या प्रकरणात कोर्टाने शेख आणि रजा मेमन याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्यायालयात झाला 'असा' युक्तिवाद 

बचाव पक्षाचे वकील - आरोपींचा मोबाइल जमा करण्याची ही एकच मागणी सरकारी वकिलांची वेगळी आहे. मागच्या दोन गुन्ह्यांत जे आरोप आरोपीवर होते, तेच तिसऱ्या गुन्ह्यातही आहे. त्यामुळे जे आरोपी न्यायालयीन कोठडीत होते त्यांच्यासाठी पुन्हा पोलिस कोठडीची गरज नाही. 

सरकारी अभियोक्ता - आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत जरी एकसारखी असली तरी त्यात पीडिता वेगवेगळ्या आहेत अन् त्यांच्याबाबत घडलेली हकिकतही वेगवेगळी आहे. आरोपींवर गुन्हेदेखील प्रत्येकी दोन ते तीन दाखल आहे. त्यामुळे सर्व गुन्ह्यांची वेगवेगळी चौकशी तर होईलच. पीडितेचा विनयभंग करून तिचा मानसिक छळ करण्यात आला आहे. तसेच पीडितेच्या धार्मिक भावनादेखील आरोपींना दुखावल्या आहेत. आरोर्पीचे मोबाइलमधील संभाषण तपासायचे असल्याने पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळावी. 

Web Title : टीसीएस धर्मांतरण मामला: मास्टरमाइंड निदा खान महाराष्ट्र से फरार; पुलिस तलाश जारी

Web Summary : टीसीएस धर्मांतरण मामले की मास्टरमाइंड निदा खान के महाराष्ट्र से भागने का संदेह है। पुलिस गुजरात, केरल और कश्मीर में उसकी तलाश कर रही है। एक आरोपी को हिरासत में पीटा गया; अदालत में बहसें सुनी गईं।

Web Title : TCS Conversion Case: Mastermind Nida Khan Flees Maharashtra; Police Search On

Web Summary : Nida Khan, the mastermind in the TCS conversion case, is suspected to have fled Maharashtra. Police are searching for her in Gujarat, Kerala, and Kashmir. An accused was beaten in custody; arguments heard in court.