"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:46 IST2026-04-17T12:46:03+5:302026-04-17T12:46:32+5:30

नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत धर्मांतर घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वच जण हादरले. या प्रकरणात आतापर्यंत कंपनीच्या महिला एचआर मॅनेजरसह एकूण आठ जणांना अटक केली आहे

"If our children are guilty, punish them"; Parents of accused express anger over TCS conversion case | "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप

"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप

नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत धर्मांतर घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वच जण हादरले. या प्रकरणात आतापर्यंत कंपनीच्या महिला एचआर मॅनेजरसह एकूण आठ जणांना अटक केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आठ महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांवर लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या आठ कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या तक्रारींच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली. वरिष्ठ सहकाऱ्यांनी आपला मानसिक आणि लैंगिक छळ केला आणि एचआर विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं असा दावा पीडित कर्मचाऱ्यांनी केला होता.

धर्मांतरच्या या धक्कादायक प्रकरणावर आरोपींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. "आमची मुलं दोषी असतील तर त्यांना फाशी द्या. या प्रकरणाच्या आडून हिंदू-मुस्लिम वाद उभा केला जात आहे. समाजात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे" असं एका नातेवाईकाने म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याने असं म्हटलं आहे. 

HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?

"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी

पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप एचआर मॅनेजरवर आहे. अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींची नावं दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सारी अशी आहेत. अटकेनंतर न्यायालयाने एचआर मॅनेजरला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 

"आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा

TCS च्या नाशिक युनिटमध्ये जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप असलेल्या निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. याच दरम्यान कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार निदा प्रेग्‍नेंट आहे. यामुळेच सध्या फरार असलेल्या निदाने नाशिकच्या स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यामध्ये तिने आपल्या प्रकृतीचं कारण मुख्यत्वे नमूद केलं आहे. निदा ही 'एचआर' (HR) असल्याचं आधी सांगितलं जात होतं, परंतु प्रत्यक्षात ती 'प्रोसेसिंग असोसिएट' आहे. तिला या प्रकरणात विनाकारण अडकवण्यात येत असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 

Web Title : नाशिक टीसीएस धर्मांतरण मामला: परिजनों ने कहा, दोषी हों तो बच्चों को फांसी दो।

Web Summary : नाशिक टीसीएस धर्मांतरण मामले में आरोपियों के परिजनों का गुस्सा। परिजनों ने कहा, दोषी हों तो बच्चों को फांसी दो। रिश्तेदारों का आरोप है कि यह मामला हिंदू-मुस्लिम वैमनस्य को बढ़ावा दे रहा है और सामाजिक घृणा फैला रहा है। एचआर मैनेजर पर शिकायतें अनदेखी करने का आरोप।

Web Title : Nashik TCS conversion case: Families demand death penalty if children guilty.

Web Summary : Families of those accused in the Nashik TCS conversion case express outrage. They demand the death penalty if their children are guilty. Relatives allege the case is fueling Hindu-Muslim discord and spreading societal hatred. HR manager is accused of ignoring complaints.