“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:39 IST2026-04-17T13:38:16+5:302026-04-17T13:39:02+5:30

Sanjay Raut News: राज्यसभेला आम्ही शरद पवारांच्या पाठीशी राहिलो आता पवार गट आणि उद्धवसेना यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली.

sanjay raut said if uddhav thackeray is the candidate the legislative council elections can be held unopposed | “उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले

“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले

Sanjay Raut News: विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते. उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषद सदस्य झाले. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असताना ते पुन्हा सभागृहात येतील का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी घ्यावी, असा त्यांच्या पक्षात आग्रह असल्याचे म्हटले जाते. विधिमंडळातील पक्षाची घडी नीट राहावी, यासाठी त्यांचे आमदार होणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह पक्षात आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्कंठा आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. 

राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता व ती निवडणूक बिनविरोध झाली होती. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एकच जागा विधान परिषदेत निवडून आणता येणार आहे. २०२० मध्ये या नऊ जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार होणे अनिवार्य होते. तेव्हाच नऊ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. राज्यसभेला आम्ही शरद पवारांच्या पाठीशी राहिलो आता पवार गट आणि उद्धवसेना यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि दुसरीकडे ही जागा उद्धव ठाकरेंसाठीच सोडावी अशी भूमिका घेतली गेली तर मविआत पेच निर्माण होईल. याबाबत संजय राऊतांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल

संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला जे समजते, त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. आता महाविकास आघाडीकडून खासकरून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून १-२ दिवसात निर्णय घेऊ.

दरम्यान, शिंदेसेनेच्या वाट्याला दोन जागा जातील. गेल्यावेळी एकत्रित शिवसेनेकडून जिंकलेल्या आणि बंडामध्ये एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांचा कार्यकाल १३ मे रोजी संपत आहे. शिंदे हे त्यांना संधी देतील का आणि दिली तर दुसरा उमेदवार कोण याबाबत चर्चा होत आहे. पक्षात दहा ते बारा प्रबळ दावेदार आहेत. अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी की अन्य कोणी याबाबतही उत्सुकता आहे.

 

Web Title : उद्धव ठाकरे की उम्मीदवारी से विधान परिषद चुनाव निर्विरोध हो सकता है: राउत

Web Summary : संजय राउत का सुझाव है कि उद्धव ठाकरे की उम्मीदवारी से विधान परिषद चुनाव निर्विरोध हो सकता है। कांग्रेस के रुख और संभावित आंतरिक संघर्षों को ध्यान में रखते हुए, एमवीए पार्टियों को अपनी रणनीति तय करने की आवश्यकता है। चर्चा जारी है।

Web Title : Uddhav Thackeray's Candidacy Could Lead to Unopposed Council Election: Raut

Web Summary : Sanjay Raut suggests Uddhav Thackeray's candidacy for the Legislative Council could result in an unopposed election. MVA parties need to decide on their strategy, considering Congress's stance and potential internal conflicts. Discussions are ongoing.