‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:18 IST2026-04-17T14:17:10+5:302026-04-17T14:18:14+5:30
Amit Shah: महिला आरक्षण आणि लोकसभा मतदरासंघांच्या पूनर्रचनेसाठी बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा गुरुवारचा पहिला दिवस वादळी ठरला. लोकसभेतील ८५० जागांचा आकडाही समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी या सर्व तर्कांना उत्तर दिलं आहे.

‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित
महिला आरक्षण आणि लोकसभा मतदरासंघांच्या पूनर्रचनेसाठी बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा गुरुवारचा पहिला दिवस वादळी ठरला. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या हेतूवर विश्वास ठेवता येणार नसल्याचे म्हटले आहे. आमचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे., मात्र हा विषय पुनर्रचनेपासून वेगळा करण्यात आला तरच आम्ही पाठिंबा देऊ. महिला आरक्षण विधेयक हा दिखावा आहे, त्याच्या आडून पुनर्रचना लागू करण्याची खेळी खेळली जात आहे.
या मुद्द्यावर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, महिला आरक्षणासोबत पुनर्रचनेला जोडणं म्हणजे प्रत्यक्षात महिला आरक्षणाला रोखण्याचंच काम आहे. याचदरम्यान, लोकसभेतील ८५० जागांचा आकडाही समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी या सर्व तर्कांना उत्तर दिलं आहे. अमित शाह यांनी सांगितले की, या तीन विधेयकांमुळे दक्षिणेतील राज्यांच्या लोकसभेच्या जागांची संख्या कमी होईल, असा दावा केला जात आहे. लोकसभेमध्ये सध्या दक्षिणेतील राज्यांच्या जागा ह्या १२९ आहेत. तसेच त्यांची संख्या वाढून ती १९५ होईल. तर तामिळनाडूमध्ये जागांचा आकडा ३९ वरून वाढून ५ एवढा होईल. दक्षिणेतील राज्यांची शक्ती अजिबात कमी होणार नाही. उलट दक्षिणेतील राज्यांमध्ये या विधेयकावरून भ्रम निर्माण केला जात आहे.
यावेळी सरकार जातीनिहाज जनगणना करण्यास इच्छूक नसल्याचा आरोपही अमित शाह यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले जनगणना दोन टप्प्यात होते. आधी घरांची मोजणी होते. त्यानंतर रहिवाशांची विचारणा केली जाते. आता यात ८५० हा आकडा कुठून आला, हे मलाही माहिती आहे. समजा १०० जागा असल्या तर त्यात ३३ टक्के आरक्षण द्यायचं असेल आणि त्यात ५० जागांची वाढ झाली तर १५० जागा होतात. तसेच ८५० ही राऊंड ऑफ फिगर आहे.