Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:24 IST2026-04-17T15:23:16+5:302026-04-17T15:24:57+5:30

Reel Star Sonali Jadhav Death: सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या ३४ वर्षीय महिलेच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

pandharpur reel star woman Sonali Jadhav strangled to death in love affair | Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...

Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...

महाराष्ट्राच्यापंढरपूरमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या ३४ वर्षीय महिलेच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे.

भोसे गावची रहिवासी असलेली सोनाली नेताजी जाधव फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड एक्टिव्ह होती. ती नियमितपणे रील बनवत असे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली पतीपासून वेगळी होऊन आपल्या माहेरी राहत होती. माहेरी राहत असतानाच तिचे गावातील तुकाराम गावंधरे याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं मात्र काही काळानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

असा रचला हत्येचा कट

सोनालीचे इतर कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय तुकारामला होता. याच संशयातून त्याने तिला संपवण्याचा कट रचला. ६ एप्रिल रोजी वाढदिवसाचं निमित्त साधून 'तुला गिफ्ट देतो' असं आमिष दाखवून तुकारामने सोनालीला बाहेर बोलावलं. तिला आपल्या मोटारसायकलवर नेऊन त्याने तिची निर्घृण हत्या केली. दोन दिवस सोनालीशी कोणताही संपर्क न झाल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी करकंब पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

कालव्यात आढळला मृतदेह

रोपळे परिसरातील एका कालव्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली. तपासाअंती तो मृतदेह सोनाली जाधवचाच असल्याचं निष्पन्न झालं. संशयाच्या आधारे पोलिसांनी तुकाराम गावंधरेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी तुकारामने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की, सोनालीचा गळा दाबून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात फेकून दिला. या हत्येमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात भीती आणि संतापाचं वातावरण आहे.
 

Web Title : रील स्टार की जन्मदिन पर प्रेमी द्वारा हत्या, गांव सदमे में।

Web Summary : पंढरपुर में एक 'रील स्टार' की उसके प्रेमी ने जन्मदिन के उपहार का लालच देकर हत्या कर दी। उसे उसकी वफादारी पर शक था, उसने गला घोंटकर उसकी हत्या कर दी और उसके शव को एक नहर में फेंक दिया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Reel star murdered by boyfriend on birthday, village shocked.

Web Summary : A 'reel star' was murdered in Pandharpur by her boyfriend, who lured her with a birthday gift. He suspected her fidelity, strangled her, and dumped her body in a canal. Police are investigating.