युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:45 IST2026-04-17T15:44:22+5:302026-04-17T15:45:30+5:30

युट्यूबने शॉर्ट्स पाहण्याची सवय सोडवण्यासाठी 'Zero Limit' फीचर लाँच केले आहे. आता युजर्स शॉर्ट्स फीड कायमचे बंद करू शकतात.

YouTube shorts will now be gone! The company has introduced a new setting; See how to permanently turn off shorts in one minute? | युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?

युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?

जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना तासनतास यूट्यूब शॉर्ट्स पाहण्याची सवय लागली असेल, तर आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. युट्यूबने अखेर एक असे फीचर आणले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही शॉर्ट्स फीड कायमचे बंद करू शकता. कंपनीने शॉर्ट्ससाठी 'टाइम लिमिट' सेटिंगमध्ये मोठा बदल केला असून, आता युजर्सना ही मर्यादा थेट झिरोवर सेट करण्याची सुविधा मिळाली आहे.

काय आहे हे नवीन फिचर?

युट्यूबवर याआधीही टाइम लिमिट सेट करण्याचा पर्याय होता, मात्र त्यात किमान १५ मिनिटे शॉर्ट्स पहावेच लागत होते. आता कंपनीने हे अपडेट केले असून, युजर्स वेळेची मर्यादा '०' मिनिटांवर सेट करू शकतात. एकदा का तुम्ही ही सेटिंग 'झिरो' वर सेट केली, की तुमच्या यूट्यूब फीडमध्ये शॉर्ट्स दिसणे बंद होईल. तुम्ही चुकून शॉर्ट्स सेक्शनमध्ये गेलात तरी तिथे एक पॉप-अप येईल, जो तुम्हाला आठवण करून देईल की तुमची डेली लिमिट संपली आहे.

पालकांना मिळणार मोठा कंट्रोल

आजकाल मुले तासनतास मोबाइलवर शॉर्ट्स पाहत बसतात, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. अशा पालकांसाठी हे फिचर वरदान ठरणार आहे. विशेष म्हणजे, जे अकाऊंट्स 'गुगल फॅमिली लिंक'द्वारे मॅनेज केले जातात, त्यामध्ये मुले स्वतःहून ही सेटिंग बदलू शकणार नाहीत. यामुळे पालकांना मुलांच्या स्क्रीन टाइमवर पूर्ण नियंत्रण ठेवता येईल.

सेटिंग कशी ऑन करायची? 

यूट्यूबने हा पर्याय सेटिंगमध्ये थोडा आत लपवून ठेवला आहे. तो शोधण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

१. सर्वात आधी तुमचे YouTube App ओपन करा.
२. उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
३. आता Settings मध्ये जाऊन Time Management हा पर्याय निवडा.
४. खाली स्क्रॉल केल्यावर तुम्हाला Daily Shorts Feed Limit हा पर्याय दिसेल.
५. येथील टॉगल बटण ऑन करा आणि वेळेच्या पर्यायांपैकी 'Zero Minutes' निवडा.

आता तुमच्या फीडमधून शॉर्ट्स गायब होतील आणि तुमचा मौल्यवान वेळ वाचण्यास मदत होईल. हे फिचर सध्या टप्प्याटप्प्याने रोल आउट केले जात आहे.

Web Title : यूट्यूब शॉर्ट्स की लत छूटेगी! शॉर्ट्स को हमेशा के लिए ब्लॉक करने की सेटिंग।

Web Summary : यूट्यूब ने शॉर्ट्स के लिए 'ज़ीरो-मिनट' टाइम लिमिट पेश की, जिससे यूज़र्स शॉर्ट्स फीड को पूरी तरह से ब्लॉक कर सकते हैं। गूगल फ़ैमिली लिंक के ज़रिए माता-पिता को बच्चों के स्क्रीन टाइम को सीमित करने का नियंत्रण मिलता है। यह सुविधा धीरे-धीरे शुरू हो रही है; यूज़र्स इसे सेटिंग्स में पा सकते हैं।

Web Title : YouTube Shorts Addiction No More! New Setting to Block Shorts Forever.

Web Summary : YouTube introduces a 'zero-minute' time limit for Shorts, letting users block the Shorts feed entirely. Parents gain control, limiting children's screen time via Google Family Link. The feature is rolling out gradually; users can find it in settings.