भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:33 IST2026-04-17T16:33:06+5:302026-04-17T16:33:27+5:30

चिनी कंपनी Seres ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये इन-कार टॉयलेटची सुविधा देण्यासाठी पेटंट घेतले आहे. लांबच्या प्रवासासाठी ही सुविधा कशी असेल? जाणून घ्या सविस्तर.

Chinese carmaker Seres patents 'In-Car Toilet' for Electric Vehicles | भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट

भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट

ऑटोमोबाईल क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असते, पण आता एका चिनी कंपनीने असा काही शोध लावला आहे की ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. चिनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी 'सेरेस' ने कारच्या आतच 'इन-कार टॉयलेट' बसवण्याचे पेटंट घेतले आहे. लांबच्या प्रवासात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी कंपनीने हा क्रांतिकारी विचार मांडला आहे.

नेमकी संकल्पना काय आहे?
सेरेसने आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार्ससाठी हे पेटंट दाखल केले आहे. यामध्ये कारच्या सीटमध्येच एक फोल्डिंग किंवा हायड्रॉलिक टॉयलेट सिस्टीम असेल, जी गरज पडल्यावर वापरता येईल.

हायजिन आणि तंत्रज्ञान

या टॉयलेटमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी प्रगत व्हॅक्यूम सिस्टीम आणि दुर्गंधी रोखण्यासाठी खास फिल्टर तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कोणासाठी फायदेशीर?

लांब पल्ल्याचा प्रवास करणारे, हायवेवर वॉशरूमची सुविधा नसलेली ठिकाणे किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकते.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण
या बातमीमुळे जगभरातील ऑटोमोबाईल प्रेमींमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याला 'भविष्यातील गरज' म्हणत आहेत, तर काही जण कारमधील सुरक्षितता आणि हायजिनच्या मुद्द्यावरून यावर टीका करत आहेत. ही कार प्रत्यक्षात कधी लाँच होणार, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

Web Title : अनोखा या अजीब? कारों में अब टॉयलेट! सेरेस का पेटेंट।

Web Summary : चीनी कंपनी सेरेस ने इलेक्ट्रिक वाहनों के लिए इन-कार टॉयलेट का पेटेंट कराया। लंबी यात्राओं के लिए डिज़ाइन की गई इस प्रणाली में उन्नत अपशिष्ट प्रबंधन और गंध नियंत्रण के साथ एक फोल्डिंग टॉयलेट शामिल है। यह सुविधा लंबी दूरी के यात्रियों और ट्रैफिक में फंसे लोगों को लाभ पहुंचाने के लिए है, जिससे मिली-जुली प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं।

Web Title : Innovative or Odd? Cars to Get Toilets! Seres Patents Feature.

Web Summary : Chinese company Seres patents in-car toilets for electric vehicles. Designed for long journeys, the system includes a folding toilet with advanced waste management and odor control. This feature aims to benefit long-distance travelers and those stuck in traffic, sparking mixed reactions.