Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:29 IST2026-04-17T09:15:45+5:302026-04-17T19:29:13+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
17 Apr, 26 : 07:14 PM
'इराणचे आभार'; होर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट
"इराणने आताच घोषणा केली आहे की, इराणची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असून, सर्व जहाजांसाठी खुली आहे. यासाठी आभार", असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
17 Apr, 26 : 07:14 PM
देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
लोकसभेत विधेयकांवरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "काँग्रेसची ही एक खेळी आहे की, २०२९ पूर्वी महिला आरक्षण लागू होऊ द्यायचे नाही. मला माहिती आहे की, यांनी पाठिंबा दिला नाही तर हे विधेयक नामंजूर होईल. पण, देशातील महिला बघत आहे की, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? इथे गोंधळ घालून सुटका झाली, तरी निवडणुकीच्या मैदानात जाल तेव्हा कळेल", असा इशारा अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधकांना दिला.
17 Apr, 26 : 05:30 PM
मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
17 Apr, 26 : 04:45 PM
राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे केली.
17 Apr, 26 : 04:38 PM
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"
निदा खानच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीवर लावलेले सर्व आरोप खोटे असून हे संपूर्ण प्रकरण दुसऱ्या एखाद्या मुद्द्याला दाबण्यासाठी रचलं गेलं आहे. त्यांनी दावा केला की, निदाचा तक्रारदाराशी कोणताही थेट संबंध नव्हता. "सर्व काही बनावट आहे आणि भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण दाबण्यासाठी आमच्या मुलीला यात अडकवलं जात आहे" असे त्यांनी म्हटलं.वाचा सविस्तर
17 Apr, 26 : 03:22 PM
भाजपा म्हणजे भारत नाही: राहुल गांधी
आज लोकसभेत खासदार राहुल गांधी यांच्या भाषणावेळी गोंधळ निर्माण झाला. 'भाजपा हा राजकीय पक्ष आहे, जनता नाही. भाजपा म्हणजे भारत नाही किंवा भारताचे सैन्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
17 Apr, 26 : 03:02 PM
खरे बोललेलं सरकारला खटकतं, राहुल गांधींचा घणाघात
सत्तेत राहण्यासाठी सरकार दक्षिणेकडील राज्यांशी भेदभाव करतंय, सरकारला खरे बोललेलं खटकतंय. हे सरकार घाबरलेले आहे. महिला आरक्षणावर जुने विधेयक आणा आम्ही ते मंजूर करू. सरकारने आता आणलेले विधेयक हे महिला आरक्षणासाठी नाही. मतदारसंघ पुर्नरचना विधेयक महिलांना सक्षम करत नाही असा टोला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला लगावला. राहुल गांधी यांच्या भाषणावेळी सत्ताधारी खासदारांनी गोंधळ घातला.
#WATCH | "The first truth is that this is not a women's bill. This has nothing to do with the empowerment of women. This is an attempt to change the electoral map of India. Actually, it is a shameful act," says LoP, Lok Sabha, Rahul Gandhi, during special session of Parliament on… https://t.co/Eof09Sv0wqpic.twitter.com/0TnpXktC1e
— ANI (@ANI) April 17, 2026
17 Apr, 26 : 02:47 PM
नवी मुंबईत नव्या नाट्यगृहाला आग; अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न
नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ४ येथे असलेल्या नवीन नाट्यगृहाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही, मात्र नाट्यगृहाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
17 Apr, 26 : 01:08 PM
नाशिक टीसीएस प्रकरणात मोठा कट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"नाशिकमधील हे प्रकरण खूप गंभीर आहे. याच्यावर आम्ही कठोर कारवाई करतोय. टीसीएसमधील प्रकरण हा एका कटाचा भाग आहे. कंपनीने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही पाठीशी न घालण्याची टीसीएसची भूमिका आहे. या कटाचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेत याचा आम्ही तपास करु. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती दिली असून आवश्यकतेप्रमाणे त्यांची मदत घेतली जाईल," असं मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
17 Apr, 26 : 01:08 PM
भिवंडीत दोन यांत्रिक झाडू वाहनांचे लोकार्पण; स्वच्छतेला मिळणार गती
भिवंडी शहरात वाढत्या घाणीच्या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. स्वच्छता विभागाच्या ताफ्यात दोन यांत्रिक झाडू वाहनांचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्या लोकार्पणामुळे शहर स्वच्छतेच्या कामाला गती मिळणार आहे.
17 Apr, 26 : 12:17 PM
निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
TCS च्या नाशिक युनिटमध्ये जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप असलेल्या निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. याच दरम्यान कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार निदा प्रेग्नेंट आहे. यामुळेच सध्या फरार असलेल्या निदाने नाशिकच्या स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यामध्ये तिने आपल्या प्रकृतीचं कारण मुख्यत्वे नमूद केलं आहे. निदा ही 'एचआर' (HR) असल्याचं आधी सांगितलं जात होतं, परंतु प्रत्यक्षात ती 'प्रोसेसिंग असोसिएट' आहे. तिला या प्रकरणात विनाकारण अडकवण्यात येत असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाचा सविस्तर
17 Apr, 26 : 11:48 AM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल झाले असून त्यांनी मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांची सदिच्छा भेट घेतली. महापालिका निवडणुकीत मनसेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती करून निवडणूक लढवली होती. निकालात मनसेला ६ जागांवर यश मिळाले. त्यानंतर आज पहिल्यांदा राज ठाकरे नवनियुक्त मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांच्या भेटीसाठी महापालिकेत पोहचले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडेंची सदिच्छा भेट #RajThackeray#BMC#AshwiniBhidepic.twitter.com/wmwNWDZN3w
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) April 17, 2026
17 Apr, 26 : 11:23 AM
नाशिक धर्मांतर प्रकरण: अमित ठाकरे रोखठोक बोलले
नाशिकमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये धर्मांतर प्रकरणावर बोलताना अमित ठाकरे यांनी १०० टक्के सगळ्या कंपन्यांचं ऑडिट करण्याची मागणी केली. तसंच मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड द्यावा, सगळे प्रकार थांबतील, मी असतो आरोपींना थेट फाशी दिली असती, असं अमित ठाकरे म्हणाले.
17 Apr, 26 : 11:20 AM
मुंबईतील ड्रग्ज पार्टीवर अमित ठाकरे संतापले
शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जात आहेत. एका माणसाचं नाव समोर आलं की त्याच्याबद्दल आपण बोलायला लागतो. पण इतरांचं काय? त्यामुळे कठोर कारवाई करुन यांची नाकेबंदी केली पाहिजे- अमित ठाकरे
17 Apr, 26 : 10:41 AM
भारतीय खलाशांचा बळी खपवून घेणार नाही" होर्मुजमधील हल्ल्यांवरून भारताने ठणकावले
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत भारताने आता जागतिक स्तरावर कडक भूमिका घेतली आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतील वाढते धोके आणि व्यापारी टँकर्सना मिळणाऱ्या धमक्यांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला असून, या भागात त्वरित शांतता आणि सुरक्षित वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
17 Apr, 26 : 10:06 AM
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी,
भारतीय शेअर बाजारातील आजच्या सत्राची सुरुवात अत्यंत संथ आणि चढ-उतारांनी भरलेली राहिली. जागतिक संकेत आणि कंपन्यांचे तिमाही निकाल या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई (BSE) सेन्सेक्स ३४.४९ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७८,०२३.१७ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.
भारतीय शेअर बाजारातील आजच्या सत्राची सुरुवात अत्यंत संथ आणि चढ-उतारांनी भरलेली राहिली. जागतिक संकेत आणि कंपन्यांचे तिमाही निकाल या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.#sharemarket#investmenthttps://t.co/5yxUBpYE6I
— Lokmat (@lokmat) April 17, 2026
17 Apr, 26 : 09:58 AM
इम्फाळमध्ये हजारो लोकांचा मशाल मोर्चा; आंदोलक आणि सुरक्षा दलांत जुंपली
दोन मुलांच्या मृत्यूनंतर मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश झुगारून हजारो लोक मशाली घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. एका बॉम्ब हल्ल्यात दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता, त्याविरोधात हा संताप व्यक्त करण्यात आला. या मोर्चादरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये धुमश्चक्री उडाली, ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली.
17 Apr, 26 : 09:49 AM
वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. डभरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंघीतराई ग्रामपंचायत स्थित वेदांता पॉवर प्लांटमध्ये १४ एप्रिल रोजी झालेल्या भीषण बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या आता २० वर पोहोचली आहे. या गंभीर घटनेबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेत वेदांता कंपनीचे संचालक अनिल अग्रवाल, व्यवस्थापक देवेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल केलाय.
17 Apr, 26 : 09:46 AM
गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून हे स्थान मिळवलं आहे. 'ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्स'नुसार, अदानी यांची एकूण संपत्ती (Net Worth) आता ९२.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचलीये.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून हे स्थान मिळवलं आहे.#GautamAdani#mukeshambanihttps://t.co/Ze1DtnhRcC
— Lokmat (@lokmat) April 17, 2026
17 Apr, 26 : 09:37 AM
राज्यात रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते?
राज्यात १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा चाचणी सक्तीची करण्यात येणार आहे. मात्र, या भाषा प्रावीण्य चाचणीसाठी आवश्यक असलेल्या मानक कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) अद्याप अंतिम झालेल्या नाहीत. परिवहन विभागाकडून १ मेपूर्वी त्या अंतिम करून राज्यातील ५९ प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) लागू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
17 Apr, 26 : 09:36 AM
अमरावती सेक्स स्कँडल: एका फ्लॅटमध्ये अनेक अल्पवयीन मुलींचे शोषण
परतवाड्याच्या अयान अहमद नामक नराधमाने स्वतःच्या ऐयाशीसाठी अल्पवयीन मुलींच्या आयुष्याची राखरांगाेळी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आता अमरावती शहरातील उच्चभ्रू वस्तीपर्यंत पोहोचली आहे. आरोपी मानव सुगंधे (२०) याने स्वत: एक भाड्याने घेतलेला फ्लॅट मुलींवर अत्याचार करण्यासाठी अयान अहमदला चक्क ‘तासिका तत्त्वावर’ भाड्याने दिला होता.
17 Apr, 26 : 09:31 AM
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार?
विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते.
17 Apr, 26 : 09:28 AM
सूर्य कोपला, महाराष्ट्रात उन्हाच्या झळा
मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता. नागरिकांनी उन्हात जाणं टाळावं किंवा पूर्ण खबरदारी घेऊनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. १९ एप्रिलनंतर तापमानात घट, काही ठिकाणी पावसाच्या सरी.