डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:51 IST2026-04-17T09:50:24+5:302026-04-17T09:51:14+5:30

Donald Trump Iran War News: अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटीच्या चर्चा घडवून आणल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे कौतुक केले आहे.

will donald trump himself hold peace talks with iran said i am ready to go to Pakistan | डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”

डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”

Donald Trump Iran War News: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची दुसरी फेरी लवकरच पार पडू शकते, असे विधान केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच या फेरीचे यजमानपद भूषवण्याची शक्यता वर्तवली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावावर केंद्रित झाले आहे. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः पाकिस्तानला जाण्याची तयारी दर्शवली आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार आता फार दूर नाही, असे स्पष्ट संकेत देताना इस्लामाबादमध्ये करार झाल्यास आपण स्वतः पाकिस्तानला भेट देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तयारी सुरू असतानाच ट्रम्प यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. 

इराणने जवळपास सर्व प्रमुख मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे

ट्रम्प यांनी सांगितले की, वाटाघाटी अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जात आहेत. इराणने जवळपास सर्व प्रमुख मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे. इराणचा अणुकार्यक्रम संपुष्टात आणणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. इराण केवळ अण्वस्त्रे विकसित करणार नाही इतकेच नाही, तर दीर्घकाळापासून वादाचा मुद्दा ठरलेले संवर्धित युरेनियम देण्यासही तयार आहे. परंतु, ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांना दुजोरा देणारी किंवा ते नाकारणारी कोणतीही प्रतिक्रिया इराणकडून अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेत पाकिस्तानची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली असून, ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीची प्रशंसा केली आहे. त्यांचे लष्करी नेतृत्व आणि वाटाघाटी करणारे अधिकारी उत्तम काम करत आहेत, असे ट्रम्प म्हणालेत. चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये पार पडली, ज्याने शांतता उपक्रमाची सुरुवात झाली. ही चर्चा अनिर्णित राहिली, कारण अमेरिका आणि इराण या दोघांनीही आपापल्या मुद्द्यांवर ठाम राहिले. आता दुसऱ्या फेरीची तयारी सुरू आहे, मात्र बैठकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

 

Web Title : ट्रंप ईरान से शांति वार्ता के लिए तैयार, पाकिस्तान जा सकते हैं

Web Summary : डोनाल्ड ट्रंप ने ईरान के साथ संभावित शांति वार्ता का संकेत दिया, संभवतः पाकिस्तान में। ईरान परमाणु कार्यक्रम सहित प्रमुख मुद्दों पर सहमत हो गया है। ट्रंप ने पाकिस्तान के मध्यस्थता प्रयासों की सराहना की, आगे की चर्चाओं की तैयारी जारी है, तारीखें अनिश्चित हैं।

Web Title : Trump Ready for Iran Peace Talks, May Visit Pakistan

Web Summary : Donald Trump indicated potential Iran peace talks, possibly in Pakistan. Iran seemingly agreed on key issues, including its nuclear program. Trump praised Pakistan's mediation efforts, noting ongoing preparations for further discussions, though dates remain uncertain.