ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:33 IST2026-04-17T17:29:23+5:302026-04-17T17:33:41+5:30

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर सध्या इराणच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या या भेटीने आशियातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

What is Trump's beloved Munir doing in Tehran? Spying for America or meeting the new 'Supreme Leader'? Sparking discussions | ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण

ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर सध्या इराणच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या या भेटीने आशियातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. इराणमध्ये मोज्तबा खामेनेई यांची नवे 'सुप्रीम लीडर' म्हणून निवड झाल्यानंतर, कोणत्याही परदेशी बड्या नेत्याचा हा पहिलाच मोठा दौरा आहे. मात्र, या दौऱ्यात मुनीर आणि मोज्तबा खामेनेई यांची भेट होणार का? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला असून, मुनीर हे अमेरिकेसाठी हेरगिरी करत असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे.

काय आहे मुनीर-खामेनेई भेटीचा सस्पेन्स?

सहसा, जेव्हा एखाद्या देशाचे लष्करप्रमुख किंवा महत्त्वाचे नेते इराणला भेट देतात, तेव्हा त्यांची भेट तिथल्या सर्वोच्च नेत्याशी होणे ही एक शिष्टाचार मानला जातो. मात्र, जनरल मुनीर आणि मोज्तबा खामेनेई यांच्या भेटीबाबत अजूनही गुप्तता पाळली जात आहे. या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे, कारण इराणमधील नव्या सत्ता समीकरणांची माहिती घेण्यासाठी हा दौरा अत्यंत कळीचा मानला जात आहे.

ट्रम्प यांचं कनेक्शन आणि हेरगिरीच्या चर्चा

एककीडे इराणशी संबंध सुधारण्याचे नाटक सुरू असताना, दुसरीकडे जनरल मुनीर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खास मर्जीतील मानले जातात. ट्रम्प यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमात मुनीर यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे, मुनीर हे केवळ पाहुणे म्हणून इराणला गेले आहेत की इराणच्या सत्तेत सध्या कोणाचे वजन जास्त आहे, याची ग्राऊंड रिपोर्ट घेण्यासाठी गेले आहेत? अशा चर्चा संरक्षण वर्तुळात रंगल्या आहेत. तेहरानमधील राजकीय हालचालींची माहिती मुनीर अमेरिकेला पुरवू शकतात, असा संशय काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मध्यस्थाची भूमिका की दुहेरी खेळी?

पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि जनरल मुनीर यांना 'काबिल' नेते संबोधत त्यांचे कौतुक केले होते. ट्रम्प यांनी तर इराणसोबतचा सीझफायर वाढवण्याचे संकेतही दिले आहेत. जर वेळेत करार झाला, तर हा युद्धविराम अधिक काळ टिकू शकतो, असेही अमेरिकेने म्हटले आहे.

मुनीर-गलिबाफ भेट आणि गुपित

आपल्या दौऱ्यात जनरल मुनीर यांनी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचे तपशील इराणच्या सरकारी टीव्हीने किंवा पाकिस्तानने जाहीर केलेले नाहीत. ही गुप्तता या दौऱ्यामागचा उद्देश अधिक गूढ बनवत आहे. सध्या जगाचे लक्ष याकडे लागले आहे की, मुनीर या दौऱ्यातून शांततेचा संदेश घेऊन परततात की अमेरिकेसाठी एखादी मोठी माहिती घेऊन बाहेर पडतात.

Web Title : ईरान में पाकिस्तानी जनरल मुनीर: जासूसी या नए नेता से मुलाकात?

Web Summary : जनरल मुनीर की ईरान यात्रा से नेतृत्व परिवर्तन के बीच अटकलें तेज। सवाल: क्या वह मध्यस्थ, अमेरिका के लिए जासूस (ट्रम्प कनेक्शन), या जमीनी रिपोर्ट चाहते हैं? गलिबाफ के साथ उनकी मुलाकात रहस्यमय है।

Web Title : Pakistan's General Munir in Iran: Espionage or Meeting New Leader?

Web Summary : General Munir's Iran visit sparks speculation amid leadership changes. Questions arise: Is he a mediator, spy for the US (Trump connection), or seeking ground reports? His meeting with Ghalibaf remains undisclosed, fueling intrigue.