"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 18:38 IST2026-04-17T18:37:35+5:302026-04-17T18:38:03+5:30

राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात करताना स्वतःबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या एका मिश्किल विधानाने हा हशा पिकला.

The Prime Minister and I don't even have a wife What exactly did Rahul Gandhi say in Parliament | "पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा

"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा

संसदेत महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकावर (१३१ वे संविधान दुरुस्ती विधेयक) चर्चा सुरू असताना आज शुक्रवारी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचे भाषण झाले. दरम्यान एक असा प्रसंग घडला की, लोकसभेत एकच हशा पिकला. राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात करताना स्वतःबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या एका मिश्किल विधानाने हा हशा पिकला.

संसदेत नेमकं काय घडलं? -
राहुल गांधी भाषणासाठी उभे राहीले, तेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्या हाताला झालेल्या दुखापतीसंदर्भात विचारले. राहुल यांनी काही इजा झाल्याचे सांगितले आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली. महिलांच्या योगदानासंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, "आई, बहीण, पत्नी अशा इतरही विविध रूपांत महिलांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. मात्र, पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही." हे ऐकताच सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये एकच हशा पिकला. राहुल पुढे म्हणाले, पत्नीच्या संदर्भातील अनुभव तर आपल्याकडे नाही. मात्र, इतर रूपांतील महिलांनी आपल्याला अत्यंत प्रभावित केले आहे.

प्रियंका गांधी आणि इंदिरा गांधींसंदर्भात काय म्हणाले? -
प्रियंका गांधींचे कौतुक करताना राहुल गांधी म्हणाले, जे मी २० वर्षांत करू शकलो नाही ते प्रियंकाने काल पाच मिनिटांच्या भाषणात करून दाखवले. गृहमंत्री अमित शाह यांच्या चेहऱ्यावरही हसू आले. तसेच आजी इंदिरा गांधींनी आपल्याला भीतीशी लढायला आणि सत्य-अहिंसेचा पाठ शिकवल्याचेही ते म्हणाले.

"संपूर्ण विरोधीपक्ष विधेयकाच्या विरोधात" -
राहुल गांधी पुढे म्हणाले, "या विधेयकाचा महिला सक्षमीकरणाशी कोणताही संबंध नाही. हे विधेयक ओबीसी, एससी आणि एसटी बांधवांच्या विरोधात असून त्यांचे अधिकार हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे," असा आरोप त्यांनी केला. महिलांच्या मागे लपून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा घाट घातला जात असून, संपूर्ण विरोधीपक्ष या विधेयकाच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.

राहुल गांधी लोकसभा भाषण २०२६, महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक, राहुल गांधी पत्नी विधान हशा, प्रियंका गांधी संसद भाषण कौतुक, Rahul Gandhi Lok Sabha Speech 2026, Rahul Gandhi Wife Remark Parliament, Women's Reservation Bill Opposition, Rahul Gandhi on Priyanka Gandhi,

Web Title : राहुल गांधी के 'पत्नी नहीं' वाले बयान पर संसद में हंसी।

Web Summary : महिला आरक्षण पर संसदीय बहस के दौरान राहुल गांधी की 'पत्नी नहीं' वाली टिप्पणी पर हंसी आई। उन्होंने प्रियंका गांधी की प्रशंसा की और अपनी दादी, इंदिरा गांधी के बारे में बात की। उन्होंने ओबीसी, एससी और एसटी समुदायों को कमजोर करने का आरोप लगाते हुए विधेयक का विरोध भी किया।

Web Title : Rahul Gandhi's 'no wife' remark triggers laughter in Parliament.

Web Summary : Rahul Gandhi's remark about not having a wife, during a parliamentary debate on women's reservation, caused laughter. He praised Priyanka Gandhi and spoke about his grandmother, Indira Gandhi. He also opposed the bill, alleging it disempowers OBC, SC, and ST communities.