डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:48 IST2026-04-17T19:43:09+5:302026-04-17T19:48:12+5:30
High Income Skills: आजच्या डिजिटल युगात फ्रीलान्सिंगमुळे तरुणांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

High Income Skills: आजच्या डिजिटल युगात अनेक तरुण घरबसल्या देश-विदेशातील क्लायंट्ससोबत काम करून चांगली कमाई करत आहेत. जर तुमच्याकडे एक मजबूत स्किल असेल आणि रोज काही तास देण्याची तयारी असेल, तर फ्रीलान्सिंग तुमच्यासाठी मोठा कमाईचा स्रोत ठरू शकतो.

1. डिजिटल मार्केटिंग- आज प्रत्येक व्यवसाय ऑनलाइन उपस्थिती वाढवू इच्छितो. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामध्ये SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, Google Ads, कंटेंट मार्केटिंग या स्किल्स शिकून तुम्ही कंपन्यांसाठी किंवा क्लायंट्ससाठी काम करून चांगली कमाई करू शकता.

2. व्हिडिओ एडिटिंग- YouTube, Instagram Reels आणि OTT प्लॅटफॉर्म्समुळे व्हिडिओ कंटेंटची मागणी वाढली आहे. व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग येत असल्यास फ्रीलान्स प्रोजेक्ट्स सहज मिळू शकतात. ही स्किल सध्या सर्वाधिक डिमांडमध्ये आहे.

3-. वेब डेव्हलपमेंट- आज प्रत्येक कंपनीला स्वतःची वेबसाइट आवश्यक आहे. यामध्ये Front-end आणि Back-end डेव्हलपमेंट, HTML, CSS, JavaScript ही तंत्रज्ञाने शिकून तुम्ही वेबसाइट तयार करून फ्रीलान्सिंग किंवा जॉबद्वारे चांगली कमाई करू शकता.

4. डेटा अॅनालिटिक्स- डिजिटल युगात डेटा ही सर्वात मोठी संपत्ती मानली जाते. डेटा अॅनालिस्टचे काम माहितीचे विश्लेषण करणे आणि त्यातून उपयोगी निष्कर्ष काढणे आहे. कंपन्या अशा प्रोफेशनल्सना चांगले पगार देतात.

5. सोशल मीडिया मॅनेजमेंट- आज प्रत्येक ब्रँड सोशल मीडियावर सक्रिय आहे. यामध्ये कंटेंट तयार करणे, पोस्ट शेड्यूल करणे आणि ऑडियन्ससोबत संवाद ठेवणे आहे. ही स्किल शिकूनही घरबसल्या चांगली कमाई करता येते.
















