ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 22:40 IST2026-04-16T22:39:28+5:302026-04-16T22:40:25+5:30

Israel Lebanon Ceasefire 2026: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इजरायल आणि लेबनॉनमध्ये ३४ वर्षांनंतर युद्धबंदी जाहीर झाली आहे.

Israel Lebanon Ceasefire 2026: Historic moment! Ceasefire between Israel and Lebanon after 34 years; President Trump's successful mediation, a new dawn of peace in the Middle East | ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी

ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी

मध्य-पूर्वेतील तणाव निवळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने इजरायल आणि लेबनॉन यांनी अधिकृतपणे १० दिवसांसाठी युद्धबंदी जाहीर केली आहे. गेल्या ३४ वर्षांपासून या दोन देशांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संघर्ष सुरू होता, जो आता थांबणार आहे.

जगाचे लक्ष लागून असलेल्या इजरायल-लेबनॉन संघर्षात अखेर एक मोठी सकारात्मक घडामोडी घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इजरायल आणि लेबनॉन दरम्यान १० दिवसांच्या तात्पुरत्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. ही युद्धबंदी केवळ सुरुवात असून, दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प प्रशासन आक्रमकपणे प्रयत्न करत आहे.

१० दिवसांच्या युद्धबंदीचा प्लॅन काय?
मानवतावादी दृष्टिकोन: या १० दिवसांच्या काळात युद्धग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे आणि त्यांना जीवनावश्यक मदत पुरवणे याला प्राधान्य दिले जाईल.

चर्चेला संधी: या तात्पुरत्या विरामाचा उपयोग करून दोन्ही देशांमधील वादाचे मुख्य मुद्दे टेबलवर बसून सोडवण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.

लष्करी हालचालींवर मर्यादा: या काळात दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारचे हवाई हल्ले किंवा लष्करी कारवाई केली जाणार नाही, असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.

'लास्टिंग पीस'साठी ट्रम्प यांचा आग्रह
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, १० दिवसांची युद्धबंदी हा केवळ तात्पुरता उपाय नसून, याद्वारे दोन्ही देशांना भविष्यातील 'कायमस्वरूपी शांतता करारा' कडे वळवायचे आहे. "मध्य-पूर्वेतील रक्तपात थांबवण्यासाठी आता वेळ आली आहे," असे विधान ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून केले आहे.

Web Title : 34 वर्षों बाद इजरायल-लेबनान में युद्धविराम; ट्रंप ने कराई शांति

Web Summary : राष्ट्रपति ट्रम्प की मध्यस्थता से इज़राइल और लेबनान 34 वर्षों के बाद युद्धविराम पर सहमत हुए। इज़रायली सेना दक्षिणी लेबनान से हटेगी, और हिज़्बुल्लाह को लिटानी नदी के उत्तर में निहत्था होना होगा। सीमा सुरक्षा के लिए अंतर्राष्ट्रीय पर्यवेक्षक तैनात हो सकते हैं, जिससे वैश्विक तेल की कीमतों में गिरावट आ सकती है।

Web Title : Israel-Lebanon Ceasefire After 34 Years; Trump Mediates Peace Deal

Web Summary : A 34-year conflict ends as Israel and Lebanon agree to a ceasefire brokered by President Trump. Israeli forces will withdraw from Southern Lebanon, and Hezbollah must disarm north of the Litani River. International observers may be deployed to secure borders, potentially easing global oil prices.