मुंबईतील वानखेडेच्या मैदानात गुरुवारी रंगलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात पॉवर प्लेमध्ये सिंग इज किंग शो पाहायला मिळाला. PBKS चा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे MI च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये क्विंटन डी कॉकची एन्ट्री झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्शदीप सिंगचा पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो
रायन रिकल्टनसह त्याने डावाची सुरुवात कली. पहिल्या चार सामन्यात विकेट लेस राहिलेल्या अर्शदीप सिंग याने डावाच्या तिसऱ्या आणि आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर रायन रिकल्टनच्या रुपात संघाला MI ला पहिला धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी आलल्या सूर्यकुमार यादवलाही त्याने आल्या पावली माघारी धाडले. अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यामुळे अवघ्या १२ धावांवर MI आघाडीच्या दोन विकेट्स गमावल्या.
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
सूर्यकुमार यादव २१ सामन्यानंतर ओढावली 'ही' नामुष्की
मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली. पण त्यानंतर संघावर पराभवाच्या हॅटट्रिकची नामुष्की ओढावली. गोलंदाजीत बुमराहच्या फ्लॉप शोसह सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे MI च्या अडचणीत भर पडली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत तरी सूर्याची बॅट तळपेल, असे वाटत होते. पण अर्शदीप सिंगसमोर तो फिका ठरला. आयपीएलमधील २१ IPL सामन्यानंतर त्याच्यावर गोल्डन डकची नामुष्की ओढावली. अर्शदीप सिंगसमोर सूर्या संघर्ष करताना दिसले आहे. यावेळीही तेच घडलं. ८ डावात ३६ चेंडूत ४२ धावा खर्च करत अर्शदीप सिंगने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा सूर्यकुमार यादवची शिकार केली.