MI vs PBKS Shreyas Iyer and Xavier Bartlett Unbelievable Relay Catch : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुरुवारी वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने क्षेत्ररक्षणाचा अविश्वसनीय नजराणा पेश केला. मुंबई इंडियन्सच्या डावातील १८ व्या षटकात हार्दिक पांड्याने मोठा फटका खेळला. या चेंडूवर त्याला ६ धावा मिळाल्या हे जवळपास पक्के होते. पण श्रेयस अय्यरनं सुपरमॅनच्या तोऱ्यात सीमारेषे बाहेर हवेत झेपावत झेवियर बार्टलेटच्या साथीनं अप्रतिम रिले कॅच घेत हार्दिक पांड्या खेळ खल्लास केला. हा झेल IPL मधील सर्वोत्तम झेलपैकी एक ठरेल, असाच होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रेयस अय्यरचा सुपरमॅन अवतार, रिले कॅच घेतल्यावर आत्मविश्वासही दिसला
मुंबई इंडियन्सच्या धावफलकावर १७५ धावा असताना मार्को यान्सेन गोलंदाजी करत होता. धावगती वाढवण्याच्या प्रयत्ना असलेल्या हार्दिक पांड्याने तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळला. सीमारेषेवर श्रेयस अय्यरनं क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नमुना पेश करताना हवेत झेपावल्यावर जागरुकता दाखवत कमालीच्या नियंत्रणासह चेंडू झेवियर बार्टलेटच्या दिशेने परत फेकला. पांड्याची विकेट घेण्यासाठी मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचाचा आधार घेतला. पण त्याआधीच मोठ्या आत्मविश्वासाने अय्यरनं विकेटचा आनंद साजरा केला होता.
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
क्विंटन डी कॉकसह नमन धीरची धमाकेदार केली, पण...
श्रेयस अय्यरनं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंगने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सला अवघ्या १२ धावांवर धक्क्यावर धक्के दिले. २ विकेट गमावल्यावर मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत असताना क्विंटन डी कॉकनं यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळताना नाबाद शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय नमन धीरनं अर्धशतकासह संघाचा डाव सावरणारी खेळी साकारली. या दोघांच्या खेळीनंतर मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडेवरील लढाई दोनशेपार धावसंख्येची करेल, असे वाटत होते. पण अय्यरच्या अप्रतिम झेलमुळे मुंबई इंडियन्सच द्विशतक हुकलं.