"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 20:42 IST2026-04-17T20:40:50+5:302026-04-17T20:42:19+5:30
यापूर्वी, लोकसभेत बोलताना, "महिलांच्या मागे लपून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा घाट घातला जात असून, संपूर्ण विरोधीपक्ष या विधेयकाच्या विरोधात असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.

"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले?
केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. यानंतर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने महिलांच्या नावावर, संविधान तोडण्यासाठी, असंवैधानिक मार्गाचा वापर केल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे. यापूर्वी, लोकसभेत बोलताना, "महिलांच्या मागे लपून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा घाट घातला जात असून, संपूर्ण विरोधीपक्ष या विधेयकाच्या विरोधात असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.
सरकारने असंवैधानिक मार्ग अवलंबला -
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी 'एक्स' पोस्ट करत म्हणाले, "संशोधन विधेयक कोसळले. त्यांनी महिलांच्या नावावर, संविधान तोडण्यासाठी, असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला. भारताने बघितले. 'INDIA'ने रोखले.जय संविधान."
संशोधन विधेयक गिर गया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 17, 2026
उन्होंने महिलाओं के नाम पर, संविधान को तोड़ने के लिए, असंवैधानिक तरकीब का इस्तेमाल किया।
भारत ने देख लिया।
INDIA ने रोक दिया।
जय संविधान।
लोकसभेत काय बोलले होते राहुल गांधी? -
राहुल गांधी पुढे म्हणाले, "या विधेयकाचा महिला सक्षमीकरणाशी कोणताही संबंध नाही. हे विधेयक ओबीसी, एससी आणि एसटी बांधवांच्या विरोधात असून त्यांचे अधिकार हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे," असा आरोप त्यांनी केला. महिलांच्या मागे लपून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा घाट घातला जात असून, संपूर्ण विरोधीपक्ष या विधेयकाच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.